केंद्रीय गृहमंत्रालयाने शनिवारी देशव्यापी लॉकडाऊन येत्या 30 जून पर्यंत कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) सुद्धा याबाबत अधिकृत घोषणा केली असून राज्यात 30 जून पर्यंत हा लॉकडाऊन लागू असणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात Phase नुसार काही नियम शिथील करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु नागरिकांना रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत बाहेर फिरण्यास मनाई असून संचार बंदी लागू केली जाणार आहे.
राज्य सरकार कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. येत्या काळात कोरोनाची परिस्थिती अधिक गंभीर होणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. परंतु या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी राज्य सरकारने आतापासून तयारी सुरु केली असल्याचे ही सांगण्यात आले आहे.(महाराष्ट्र: कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांनी काम करताना 3 Ply Mask किंवा Surgical Mask लावणे अनिवार्य; राज्य सरकारकडून नवी मार्गदर्शक तत्वे जाहीर)
Maharashtra Government extends the #COVID19 lockdown till 30th June in the state. Movement of individuals to remain strictly prohibited between 9 pm to 5 am except for essential activities. pic.twitter.com/awz8mMXkDk
— ANI (@ANI) May 31, 2020
येत्या 5 जून पासून सर्व मार्केट, मार्केट परिसर आणि दुकाने पण मॉल्स आणि मार्केट कॉप्लक्स सोडून बाकी सर्व ऑड-इव्हन (Odd-Even) बेसिसवर सुरु राहणार आहे. यासाठी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतचा कालावधी ठरवून देण्यात आला आहे. मात्र कपड्यांच्या संदर्भातील दुकानांसाठी ट्रायल रुम्ससाठी परवानगी नसणार आहे. त्याचसोबत वस्तूंची बदल करण्यास किंवा परत करण्यास सुद्दा बंदी असणार आहे. दुकानदारांनी सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे पालन होईल याची खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी जवळच्या दुकानात जायचे असल्यास चालत किंवा सायकलवरुन जावे. जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंच्या विक्रीवर सुद्धा बंदी असणार आहे. त्याचसोबत सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे उल्लंघन करण्यात आल्याचे दिसून आल्यास सदर दुकान किंवा मार्केट बंद करण्यात येईल असे ही स्पष्ट करण्यात आले आहे.(पुण्यातील APMC मार्केट अखेर 50 दिवसानंतर आजपासून सुरु, 11 हजार क्विंटल शेतमालाची आवक)
From 5th June, all markets, market areas and shops, except malls and market complexes, are allowed to function on odd-even basis from 9 am to 5 pm: Maharashtra Govt guidelines pic.twitter.com/Cdj8Kl8A18
— ANI (@ANI) May 31, 2020
राज्य सरकारने Phase 1 मध्ये शारिरीक व्यायाम करण्यासाठी नागरिकांना सार्वजनिक ठिकाणे, बीच, मैदाने, गार्डन्समध्ये जाण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे नागरिकांना आता सकाळी 5 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत याचा लाभ घेता येणार असल्याचे नव्या मार्गदर्शक तत्वात स्पष्ट केले आहे. तसेच लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी पूर्णपणे बंदी असणार आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणे जाणे टाळावे असे ही आवाहन करण्यात आले आहे.(गोरेगाव, महालक्ष्मी, मुलुंड, दहीसर, भायखळा येथील कोविड सेंटर उभारणीचे काम अंतिम टप्यात- आरोग्यमंत्री राजेश टोपे)
What’s allowed & not allowed in Maharashtra #MissionBeginAgain pic.twitter.com/gCbYCpYQGI
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 31, 2020
येत्या 8 जून पासून सर्व खासगी कंपन्या पण 10 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र उर्वरित कर्मचाऱ्यांनी घरुनच काम करावे असे सांगण्यात आले आहे. जिल्ह्याअंतर्गत बस सेवेला परवानगी असून राज्याअंतर्गतसाठी बंदी असणार आहे. त्याचसोबत धार्मिक स्थळ आणि ठिकाणे, हॉटेल्स, हॉस्पिट्यालिटी सर्विस, शॉपिंग मॉल्स, सलून, केशकर्तनालय, स्पा आणि ब्युटी पार्लर्स सुद्धा राज्यात बंद राहणार आहे.
From 8th June, all private offices can operate with up to 10% strength as per requirement, with remaining persons working from home; Intra-district bus services will be allowed while inter-district bus services will not be permitted: Maharashtra Govt guidelines #Unlock1 pic.twitter.com/SZDjGsAxbN
— ANI (@ANI) May 31, 2020
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. महाराष्ट्रात शनिवारी नव्या 2940 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ तसेच 99 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे राज्यातील COVID19 चा आकडा 65,168 वर पोहचला असून एकूण 2197 जणांचा मृत्यू झाला आहे. याबााबत आरोग्य विभागाकडून माहिती देण्यात आली आहे