Coronavirus Outbreak (Photo Credits: IANS)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. तर केंद्र गृहमंत्रालयाने शनिवारी देशव्यापी लॉकडाऊन 5.0 ची घोषणा केली असून येत्या 30 जून पर्यंत कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच कोणत्या गोष्टींना टप्प्यानुसार सूट देण्यात आली आहे याबाबत ही सांगितले आहे. याच दरम्यान आता महाराष्ट्रात राज्य सरकारने कार्यालयांसह कर्मचाऱ्यांसाठी नवी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी चेहऱ्याला वारंवार हात लावू नका जेणेकरुन संसर्गाचा धोका उद्भवेल असे म्हटले आहे. तसेच लिफ्ट्स, टेबल्स, खुर्च्या दिवसातून तीन वेळा सोडिअम हायपोक्लोरिडाईडच्या सहाय्याने निर्जंतुकीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचसोबत कार्यालयातील अन्य गोष्टी जसे प्रिंटर्स, स्कॅनर्स, कंप्युटर्स सुद्धा अल्कोहोल बेस्ड असलेल्या गोष्टीने साफ करावेत असे सांगण्यात आले आहे.

राज्य सरकारने कार्यालयाच्या नव्या मार्गदर्शक तत्वांमध्ये असे ही म्हटले आहे की, कार्यालयात प्रवेश करण्यापूर्व व्हिजिटर्स आणि कर्मचाऱ्यांची थर्मल स्क्रिनिंग करण्यात यावी. त्याचसोबत व्यक्तीची कठोरपणे तपासणी झाली आहे की नाही ते सुद्धा पहावे. सर्व कर्मचाऱ्यांनी 3 स्तरीय किंवा सर्जिकल मास्क घालून काम करणे अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले आहे.कार्लायलातील खिडक्या  सुरु ठेवण्यात याव्यात. तसेच कर्मचाऱ्यांनी एकमेकांपासून 3 फूट अंतर ठेवावे. त्यानुसार बसण्याची सोय सुद्धा करावी असे राज्य सरकारने जाहीर केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्वात म्हटेल आहे.(महाराष्ट्र पोलिस दलात एकूण 2,416 पोलिस कोरोना बाधित; मागील 24 तासांत 91 पोलिसांना कोविड-19 ची बाधा)

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. महाराष्ट्रात शनिवारी नव्या 2940 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ तसेच 99 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे राज्यातील COVID19 चा आकडा 65,168 वर पोहचला असून एकूण 2197 जणांचा मृत्यू झाला आहे. याबााबत आरोग्य विभागाकडून माहिती देण्यात आली आहे.राज्य सरकार कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. येत्या काळात कोरोनाची परिस्थिती अधिक गंभीर होणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. परंतु या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी राज्य सरकारने आतापासून तयारी सुरु केली असल्याचे ही सांगण्यात आले आहे.