भारतात आज स्वातंंत्र्य दिनाची धामधुम पाहायला मिळत आहे, महाराष्ट्रात मुंंबई मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांंनी वर्षा बंंगला, मुंंबई उच्च न्यायालय व मंत्रालयात ध्वजारोहण केले. तर पुण्यात (Pune) विधानभवनात आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांंच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला. हा झेंडावंंदनाचा कार्यक्रम सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. या कार्यक्रमासाठी पुण्यात दाखल होताच उपमुख्यमंंत्री अजित पवार यांंनी कोश्यारी यांचे स्वागत केले, यावेळी कोश्यारी यांनी मिश्कीलपणे अजित दादांना नमस्कार करत माफ करा तुमच्या परवानगी शिवाय तुमच्या राज्यात आलो असे म्हणत टोला लगावला. हाच क्षण नेमका व्हिडिओ मध्ये सुद्धा टिपला गेला आणि आता त्यावरुनच कोश्यारी यांंच्या टोमण्याची चर्चा होत आहे.
पुणे जिल्ह्याचे मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले. ध्वजारोहणासाठी जाताना राज्यपाल आणि अजित पवार यांची समोरासमोर भेट झाली. त्यावेळी “आपके राज्य में हम बिना आपके परमिशन आ गये” असा मिश्कील डायलॉग राज्यपालांनी सुनावला ज्यावर अजितदादांंनी सुद्धा हसत त्यांंना नमस्कार केला.
राज्यपाल भगतसिंंह कोश्यारी यांंचा अजित पवारांंना टोला
माननीय राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते विधानभवन, पुणे येथे ध्वजारोहण समारंभ पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार उपस्थित होते.@MahaDGIPR @maha_governor @AjitPawarSpeaks @Divvcommpune @RajSarag pic.twitter.com/8JvNh7wKLL
— DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@InfoDivPune) August 15, 2020
राज्यपाल कोश्यारी हे सुशांंत सिंंह राजपुत च्या चौकशी साठी आलेल्या पोलिसांंच्या सोबत घडलेल्या प्रसंंगावरुन हा टोमणा मारुन गेले मात्र अजित पवार यांंनी सुद्धा अगदी नम्रपणे आणि तितक्याच मोठ्या मनाने ही मस्करी हसुन स्वीकारली.