Maharashtra Government: कोरोनाची परिस्थिती हळूहळू राज्यात सुधारत असल्याने राज्यात आर्थिक उत्पान्नाला चालना मिळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तर राज्य सरकारच्या मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 (Magnetic Maharashtra 2.0) या अभियानामार्फत विकासाच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले जात आहे. याच पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे (CM Uddhav Balasaheb Thackeray)यांच्या प्रमुख उपस्थितीत आज एमआयडीसी (MIDC) आणि विविध कंपन्यांमध्ये सामंज्यस करारांवर स्वाक्षरी करण्यात आल्या आहेत.(Mumbai Coastal Road: जुलै 2023 पर्यंत कार्यान्वित होईल मुंबईचा कोस्टल रोड; आतापर्यंत 17 टक्के काम पूर्ण- Iqbal Singh Chahal)
राज्य सरकारकडून उद्योग क्षेत्रात मोठी झेप घेतली जात आहे. तर आजच्या बैठकीत विविध कंपन्यांच्या करारांवर उद्धव ठाकरे यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यात 25 कंपन्यांचा समावेश असून यांच्या मार्फत तब्बल 61 हजार कोटींहून अधिक गुंतवणूक राज्यात केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या बैठकीवेळी उद्धव ठाकरे यांच्यासह अदिती तटकरे, सुभाष देसाई यांची सुद्धा उपस्थिती दिसून आली. (Balasaheb Thorat On Sonia Gandhi's Letter: अनुसूचित जाती जमातीच्या विकासासाठी काँग्रेस कटिबद्ध; बाळासाहेब थोरात यांची ग्वाही)
Tweet:
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज एमआयडीसी आणि विविध कंपन्यांमध्ये सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आल्या. २५ कंपन्यांमार्फत ₹ ६१ हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक राज्यात होत आहे.#MagneticMaharashtra pic.twitter.com/3R6s4BwuNJ
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 22, 2020
याआधी सुद्धा नोव्हेंबर महिन्यात सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात तब्बल 34 हजार 850 कोटींच्या गुंतवणूक करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. या माध्यमातून 23 हजार 282 रोजगार उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले होते. तर एमआयडीसी आणि 15 कंपन्यांमध्ये हे सामंजस्य करार झाले होते.