Farmer | Phto Credits: PTI

महाराष्ट्रात (Maharashtra) यावर्षी अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना  मोठा फटका  बसला आहे. मुसळधार पावसामुळं (Heavy Rain) शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. यावरुन पावसाळी अधिवेशना (Monsoon Session) दरम्यान विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलचं धारवेर धरल्याचं पाहयाला मिळालं. त्यानंतर याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना साडेतीन हजार कोटींची मदतीची घोषणा केली. यावर शिक्कामोर्तब करत शासन निर्णय काढत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना साडेतीन हजार कोटींच्या मदतीचं वितरण करण्यात येणार आहे. तरी जून (June) महिन्यात पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हा निधी वाटप करण्यात येत आहे. दोन हेक्टर (2 Hector) पर्यतच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 13,600 रुपये देण्यात येणार आहे. यासंबंधीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पावसाळी अधिवेशना (Monsoon Session) दरम्यान सभागृहात केली होती.

 

मदत वितरीत केलेल्या या योजनेत राज्यातील एकूण 19 लाख शेतकऱ्यांचा समावेश आहे. या साडेतीन हजार  कोटींच्या मदती पैकी एकट्या मराठवाड्याला (Marathwada) 1 हजार 8 कोटींची भरपाई मिळणार आहे. यात जालना (Jalna), परभणी (Parbhani), हिंगोली (Hingoli), नांदेड (Nanded), लातूर (Latur), उस्मानाबाद (Osmanabad) या भागातील शेतकऱ्यांचा प्रामुख्याने सहभाग आहे. तरी पुढील दोन दिवसांत या नुकसान भरपाईचे वाटप केले जाणार असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी दिली आहे. (हे ही वाचा:- Maharashtra Rain Update: राज्यात दमदार पावसाची हजेरी, हवामान विभागाकडून विशेष सुचना जारी)

 

संबंधीत घोषणा करतांना कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) म्हणाले, शेतकरी आसमानी संकटात सापडला होता. त्याच्या मदतीसाठी नुकसान भरपाईची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) सभागृहात केली होती. तरी आता यासंबंधीचा जीआर (Government Rule) काढण्यात आला आहे. तसेच पुढील दोन-तीन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीचे पैसे जमा करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे.