आज राज्यभरात मोठ्या उत्साहात लाडक्या बाप्पाचा विसर्जन (Ganpati Visarjan) सोहळा पार पडणार आहे. तरी राज्यातील विविध भागात मात्र सकाळ पासूनच दमदार पावसाने हजेरी लावल्याचं दिसत आहे. मुंबईसह (Mumbai) उपनगरात पावसाच्या तुरळक सरी बरसत असल्या राज्यातील इतर भागात मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता हवामान विभागाकडून (Meteorological Department) वर्तवण्यात आली आहे. तसेच कोकणात (Konkan) पावसाचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे. पुढील पाच दिवस राज्यभरात (Maharashtra) मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा देण्यात आला आहे. गेले काही दिवसांपासून वरुण राजा शांत असला तरी आता पुन्हा एकदा दमदार कमबॅक (Come Back) करत राज्यातील विविध भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.
कोकणात (Konkan) पावसाने सकाळपासून चांगलाच जोर पकडला आहे. मराठवाडा (Marathwada), पश्चिम महाराष्ट्रातील (North Maharashtra) आणि विदर्भाच्या (Vidarbha) विविध जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. नद्याकाठील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सोबतच पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होणाऱ्या भागात एनडीआरएफच्या (NDRF) तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मराठवाड्यासह विदर्भात काल पासुन विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे. (हे ही वाचा:- Ganpati Visarjan 2022: आज अनंत चतुर्दशी, पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात लाडक्या बाप्पाला निरोप)
9 Sept, Morning radar obs indicates no major clouds over Mumbai Thane around. Possibilities of light showers at isolated places during next 3,4 hrs.
That's a good sign for Munbaikars. Moryaa .... pic.twitter.com/9phlKuykx5
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 9, 2022
मुंबईसह (Mumbai) उपनगरात देखील सकाळ पासून पावसाच्या सरी बरसताना दिसत आहे. मुंबईतील पावसाचा प्रभाव मुंबईतील ट्राफीकवर (Mumbai Traffic) देखील दिसून येत आहे. विदर्भातील भंडारा (Bhandara), गोंदिया (Gondia), नागपूर (Nagpur) या जिल्ह्यांना पावसानं झोडपून काढलं आहे. शहरी भागात पावसाचा जोर कमी असला तरी ग्रामीण भागात मात्र जोरदार पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. तरी आजपासून पुढील पाच दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, अशा सुचना हवामान विभागाकडून देण्यात आल्या आहेत.