महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) आणि महाविकासआघाडी मधील संघर्षाचं नातं पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलं आहे. दरम्यान कॉंग्रेस नेते आणि कॅबिनेट मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी राज्यपाल हे त्यांचं संविधानिक पद सोडून आता राष्ट्रीय सेवक संघांचं काम करत आहेत आणि भाजपाचे नेते म्हणून वावरत असल्याची टीका केली आहे. त्यांचं वागणं दुदैवी असल्याचंही नितीन राऊत यांनी म्हटलं आहे. भारतीय लोकशाही विरूद्ध हे षडयंत्र असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. (नक्की वाचा: Sanjay Raut On Governor: राज्यपालांनी राजकीय कारणांनी सरकारची अडवणूक करु नये- संजय राऊत).
नितीन राऊतांनी राज्यापालांवर हल्लाबोल करताना त्यांच्याकडून राज्य सरकारला त्रास देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं ही म्हटलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना कोणीही भेटायला गेलं की त्यांच्याकडून केवळ आरएसएस आणि भाजपाचं कौतुक केले जाते. याचं कुणीच समर्थन करू शकत नसल्याची भावना नितीन राऊत यांनी बोलून दाखवली आहे.
ANI Tweet
He is trying to hurt the state government. He is not doing anything but praising RSS & BJP whenever anyone comes to meet him. Nobody will support this: Maharashtra Minister Nitin Raut
— ANI (@ANI) August 4, 2021
दरम्यान मुख्यमंत्र्यांवर कोरोना संकटात हिंदुत्त्वाचा मुद्दा पुढे करत देवळं बंद ठेवण्यापासून अगदी 12 विधान परिषदेचे आमदार यांच्या नावावर शिक्कामोर्तबासाठी दिरंगाई करण्यावरून अनेकदा राज्य सरकार विरूद्ध राज्यपाल असा वाद मागील काही महिन्यात पहायला मिळाला आहे. तर काल नवाब मलिकांनी देखील राज्यपालांवर हल्लाबोल केला होता. राज्यात एकाच वेळी दोन दोन सत्ताकेंद्र राबवू नयेत, असे महाविकासआघाडी सरकारने म्हटले आहे.राज्यपाल भगत सिंह कोश्यारी राज्यातील विविध जिल्ह्यांध्ये दौरे करुन आढावा बैठका घेत आहेत, यावरुन राज्य सरकारने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.