Unlock 5: महाराष्ट्रात येत्या 5 ऑक्टोबरपासून उपहारगृहे, बार सुरु करण्यास राज्य सरकारची परवानगी; नियमावली जाहीर
Representational Image (Photo Credits: Flickr)

कोरोनाच्या (Coronavirus) वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लॉकडाऊन (Lockdown) घोषीत करण्यात आला आहे. परिणामी, राज्यातील व्यवसाय, उद्योगधंदे, वाहतुकीसह बऱ्याच गोष्टी ठप्प झाल्या आहेत. यातच राज्यातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी लॉकडाउन शिथिल करण्याच्या दिशेने राज्य सरकारन वाटचाल करत आहेत. राज्यात टप्प्याटप्प्याने अनेक गोष्टी सुरु करण्यात आल्यात आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने (Maharashtra Government) महाराष्ट्रात येत्या 5 ऑक्टोबरपासून हॉटेल, उपहारगृहे, बार सुरु करण्यास परवानगी दिली आहे. यासंदर्भात राज्य सरकारकडून नियमावली (Guidelines) खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आली आहे.

राज्यातील उपहारगृहे, बार सुरु करण्यात यावी, अशा मागणींनी गेल्या अनेक दिवसांपासून जोर धरला होता. त्यानंतर 5 ऑक्टोबरपासून राज्यातील उपहारगृहे आणि बार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, एकूण क्षमतेच्या 50 टक्के ग्राहकांनाच प्रवेश देण्याचं बंधन सरकारन घातले आहे. हे देखील वाचा- Maharashtra Unlock 5 Guidelines: महाराष्ट्र सरकारने जारी केल्या अनलॉक 5 च्या मार्गदर्शक सूचना; राज्यात 50 टक्के क्षमतेसह हॉटेल, फूड कोर्ट, रेस्टॉरंट्स आणि बार उघडण्यास परवानगी

उपहारगृह आणि बारसाठी नियमावली खालीलप्रमाणे-

- उपहारगृहांचा दरवाजा ग्राहकांनी नव्हेतर कर्मचारीच उघडवावा.

- प्रत्येक ग्राहकासाठी सॅनिटायझरची सोय करण्यात यावी.

- प्रत्येक ग्राहकाची प्रवेशद्वारावर स्क्रिनिंग केली जावी. ग्राहकाला करोनाची लक्षणे आहेत का नाही? याची पडताळणी करणे गरजेचे आहे.

- कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या ग्राहकांनाच प्रवेश देता येणार आहे.

- ग्राहकाना सेवा पुरवत असताना सोशल डिस्टन्सिंग पालन करणे आवश्यक आहे.

-शक्यतो एसीचा वापर टाळावा. आवश्यकता असल्यास सतत त्यांची सफाई करत राहावी.

- हॉटेल, उपहारगृहांमध्ये आलेल्या ग्राहकांची नोंद ठेवावी लागणार आहे

- ग्राहकांना मास्क घालणे बंधनकारक असून केवळ अन्नपदार्थांचे सेवन करतानाच मास्क काढण्याची परवानगी असणार आहे.

- उपहारगृहे, हॉटेल आणि बारमालकांनी जास्तीत जास्त डिजिटल पद्धतीने पैशांची देवाण-घेवाण करावी.

- शौचालय किंवा हात धुण्याच्या जागेवर कायम स्वच्छता ठेवावी.

- कर्मचाऱ्यांचीही वेळोवेळी वैद्यकीय तपासणी अथवा करोनाची चाचणी करणे आवश्यक असेल. गरज भासल्यास करोनाच्या मदत संपर्क केंद्रावर संपर्क साधावा.

- बसण्यापूर्वी टेबलवर कोणत्याही प्लेट, ग्लास, मेन्यू कार्ड, टेबल टॉबल टॉप अथवा कोणत्याही वस्तू असू नयेत. कापडाच्या नॅपकिन ऐवजी विघटनशील कपड्याचा वापर करावा.

- डिजिटल पद्धतीच्या मेन्यू कार्डचा वापर करण्याचा प्रयत्न करावा.

- कर्मचारी आणि ग्राहक यांच्या शक्यतो कमी संपर्क असावा.

- मुंबई हॉटेल उपहारगृहे सुरू झाल्यानंतर जाण्यापूर्वी आपली नोंदणी करणे आवश्यक असेल.

- ठराविक संख्येपेक्षा अधिक ग्राहकांना प्रवेश नाकारण्यात यावा.

- दोन टेबलांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यात गरजेचे आहे.

- टेबल आणि किचनची सातत्याने आणि वेळोवेळी स्वच्छता करणे आवश्यक आहे.

- सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यासाठी जमिनीवरही खुणा करणे गरजेचे आहे.

महाराष्ट्रात आज 14 हजार 348 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 14 लाख 30 हजार 861 वर पोहचली आहे. यापैंकी 37 हजार 758 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 11 लाख 34 हजार 555 जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या 2 लाख 58 हजार 108 जणांवर उपाचार सुरू आहेत.