Maratha Community Medical Students Protest In Mumbai For Reservation (Photo Credits: File Photo)

पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशप्रक्रियेमध्ये मराठा आरक्षणावरून घोळ सुरू आहे. आज महाराष्ट्र राज्य सरकारकडून चंद्रकांत पाटील यांनी माहिती देताना मराठा आरक्षणावर आध्यादेश जारी केल्याची खुषखबर दिली आहे. सध्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना दिलासादायक बातमी आहे.  निवडणूक आयोगाकडून परवानगी मिळाल्यानंतर आज राज्य सरकारच्या मंत्रीमंडळामध्ये निर्णय घेण्यात आला आहे. सुरूवातीला नागपूर खंडपीठ आणि त्यापाठोपाठ सर्वोच्च  न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.    Maratha Resarvation : मराठा विद्यार्थ्यांचे मेडिकल पीजी प्रवेश अडचणीत येणार? सरकारच्या अध्यादेशाला न्यायालयात आव्हान मिळण्याची शक्यता

 ANI Tweet

राज्य सरकारकडून 213 जागा वाढवून देण्या बाबत विचारणा केली जाणार आहे. तसेच सध्या खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांनाही प्रवेश दिला जाणार आहे. आतापर्यंत झालेले प्रवेश तसेच कायम राहणार आहेत. यामध्ये 196 पीजी आणि 22 डेंटल पीजीच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा पेच निर्माण झाला आहे, त्यांच्या प्रवेशासाठी जागा वाढवून मिळवण्याचा प्रस्ताव सरकारने केंद्राकडे पाठवला आहे. यासाठी राज्य सरकार कॅव्हेट सादर करणार आहे.

आरक्षण प्रक्रियेमुळे ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी खासगी विद्यापीठांमध्ये किंवा डीम्ड विद्यापीठांमध्ये प्रवेश घ्यावेत, राज्य सरकार त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार असल्याचीही माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.