महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगावर शरद पवार यांनी व्यक्त केली चिंता; थोड्याच वेळात जाहीर करणार राष्ट्रवादीची भूमिका
Sharad pawar

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक निकाल लागून आता 13 दिवस उलटल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी राजकीय खलबतं रंगायला सुरूवात झाली आहे. 9 नोव्हेंबरला विधानसभेचा कार्यकाळ संपत असल्याने आता नव्या सरकारला वेळेत सत्ता स्थापन करणं आवश्यक आहे. मतदारांनी महायुतीला कौल दिला असला तरीही सत्ता संघर्षामुळे दोन्ही पक्षाचे संबंध ताणले आहेत. मात्र आता शिवसेना भाजपाची साथ सोडून राष्ट्रवादीला सोबत जाऊ शकते यासाठी चाचपणी सुरू आहे. आज संजय राऊत यांनी सिल्वर ओक या बंगल्यावर शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर या चर्चा रंगली आहे.

दहा मिनिटांच्या भेटीत नेमकं काय झालं याबाबत संजय राऊत यांनी खुलासा केला नसला तरीही 12.30 च्या सुमारास आज शरद पवार पत्रकार परिषद घेणार आहे.

शिवसेना भाजपावर अजून कोणत्याच प्रस्तावावर चर्चा झालेली नाही. शिवसेना समान सत्ता वाटपावर ठाम असल्याने आता पुढची रणनिती काय असेल याची चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे. शरद पवार यांनी कॉंग्रेस हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. त्यावेळेस मतदारांचा कौल हा आपल्याला विरोधी पक्षात बसण्याचा असल्याने तोच कायम असेल असे सांगण्यात आले होते. मात्र आता शिवसेना - राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा रंगली होती. मात्र त्यासाठी शिवसेनेने आधी भाजपाची साथ सोडावी असा प्रस्तावदेखील समोर आल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि शिवसेनेची भेट झाली तर दिल्लीमध्ये भाजपाचे नितीन गडकरी आणि कॉंग्रेसचे अहमद पटेल यांच्यामध्येही भेट झाली आहे. दरम्यान आज यशोमती ठाकुरही शरद पवारांच्या भेटीला पोहचले आहेत.