Maha Vikas Aghadi सरकारचा किमान समान कार्यक्रम जाहीर; शेतकरी, बेरोजगारी, सर्वधर्मसमभाव, सर्वसामान्य जनता आदी मुद्द्यांना प्राधान्य
Common Minimum Programme for Maha Vikas Aghadi sarkar | (Photo Credits: ANI)

Maharashtra Government Formation: शिवसेना ( Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) पक्षाच्या महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi )  सरकार सत्तेवर येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेल्या या महाविकास आघाडी सरकारचा शपथविधी आज मुंबई येथे शिवाजी पार्क ((Shivtirth)) (शिवतीर्थ) मैदानावर पार पडत आहे. दरम्यान, तत्पूर्वी या तिन्ही पक्षांना एकत्र आणणारा किमान समान कर्यक्रम आज घोषीत करण्यात आला. विधिमंडळ गटनेता एकनाथ शिंदे, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात तसेच, नवाब मलिक या अनुक्रमे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रहाष्ट्रीय काँग्रेस या पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत या कार्यक्रमाची घोषणा केली. अपेक्षेप्रमाणे कोणत्याही वादग्रस्त मुद्द्याला हात न घालता शेतकरी, सर्वसामान्य जनता आणि विकास आदी मुद्द्यांवर हा कार्यक्रम आधारलेला आहे.

किमान समान कार्यक्रमातील महत्त्वाचे मुद्दे

  • शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेऊन सरकार काम करेन
  • राज्यातील प्रत्येक नागरिकाला आरोग्य विमा देणार
  • धर्मनिरपेक्ष मुल्यांना प्राधान्य
  • कर्जमाफी, नोकरभरती, पीकविम्यासंदर्भात महत्त्वाची भूमिका

(हेही वाचा, शिवतीर्थावर पार पडणार उद्धव ठाकरे यांचा भव्य शपथविधी सोहळा; देशभरातील तमाम नेत्यांना निमंत्रणे, सुरक्षेसाठी 2000 पोलीस तैनात)

संख्याबळाचा विचार करता विधिमंडळात सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला सत्तेबाहेर ठेवत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) या सरकारचे नेतृत्व करणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्याच नावावर मुख्यमंत्री म्हणून तिन्ही पक्षांचे एकमत झाले आहे.  शिवाजी पार्क (Shivaji Park)  (शिवतीर्थ)  येथे आज (गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019) सायंकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पद आणि गोपनियतेची शपथ घेत आहे.  दरम्यान, या शपथविधीस काही अवधी बाकी असतानाच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस महाविकासआघाडीचा किमान समान कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.