Lockdown in Maharashtra: राज्यातील लॉकडाऊन मध्ये 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढ
Lockdown | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात आली असली तरी धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे कोविड-19 (Covid-19) चा संसर्ग अधिक वाढू नये म्हणून राज्य सरकारने लॉकडाऊनच्या कालावधीत वाढ केली आहे. महाराष्ट्रात 31 जानेवारी 2021 पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. दरम्यान, कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च 2020 पासून लॉकडाऊनला सुरुवात झाली. तीन महिने कडक असलेले लॉकडाऊनचे नियम हळूहळू शिथिल करण्यात आले. मात्र संकटाचा धोका कायम असल्याने लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा एकदा वाढवण्यात आला आहे.

दरम्यान, मिशन बिगेन अनेग अंतर्गत सुरु झालेल्या सेवा-सुविधा पूर्वीप्रमाणेच सुरु राहणार आहेत. इतर नियमांमध्येही काही बदल करण्यात आलेला नाही, असे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (Maharashtra SOPs For International Passengers: कोरोना व्हायरस New Strain धोक्याच्या पार्श्वभूमीवर युरोप, दक्षिण आफ्रिका, मध्य पूर्वेकडून येणाऱ्या प्रवाशांसाठी महाराष्ट्र सरकारने जारी केली नियमावली)

ANI Tweet:

तसंच नववर्षाच्या स्वागतादरम्यान कोरोना संसर्गात वाढ होऊ नये म्हणून नाईट कर्फ्यू सह विशेष नियमावली जारी करण्यात आली आहे. दरम्यान, ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन आढळून आल्याने सर्वच देशांत पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळेच केंद्र सरकारनेही युके हून येणाऱ्या विमान वाहतुकीवर 7 जानेवारी 2021 पर्यंत बंदी घातली आहे. भारतातील  20 जणांना नव्या कोरोना विषाणूची लागण झाली असून त्यापैकी एक रुग्ण पुण्यातील आहे. दरम्यान, राज्य सरकारने देखील युरोप, दक्षिण आफ्रिका, मध्य पूर्वेकडून येणाऱ्या प्रवाशांसाठी नियमावली जारी केली आहे.

कालच्या अपडेटनुसार, राज्यात एकूण 54,537 सक्रीय रुग्ण असून आतापर्यंत 18,20,021 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 94.54% झाला आहे.