Mumbai-Pune Vande Bharat Trains: राज्याला मिळाली पहिली वंदे भारत ट्रेन, मुंबई-पुणे प्रवास आता अधिक सुलभ
Vande Bharat trains (फोटो सौजन्य - PTI)

महाराष्ट्राला पहिली वंदे भारत ट्रेन ( Vande Bharat Trains) मिळाली आहे. त्यामुळे मुंबई-पुणे (Mumbai To Pune) प्रवास आता अधिक सुलभ होणार आहे. सेमी हाय स्पीड ट्रेन्स या भारतीय रेल्वेच्या (Indian Railways) सर्वात वेगवान गाड्या आहेत. त्यापैकीच एक आता महाराष्ट्रालाही मिळाली आहे. वंदे भारत ट्रेन म्हणजे महाराष्ट्रातील रेल्वे आणि रेल्वेप्रवासास मिळालेली एक प्रकारची चालनाच म्हणावे लागेल. वंदे भारत ट्रेन सुरु जाल्यानंर मुंबई ते पुणे या दोन शहरांमधील अंतर अवघ्या 150 मिनिटे ते अडिच तास इतक्या मोठ्या फरकाने कमी होईल. मुंबई आणि पुणे अशा धावणाऱ्या वंदे भारत ट्रेन्सची सेवा सुरु करण्याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून अद्याप कोणतीही तारीख जाहीर झाली नाही. मात्र, येत्या स्वातंत्र्यदिनापासून म्हणजेच 15 ऑगस्टपासून ही ट्रेन सुरु केली जाण्याची शक्यता आहे.

मुंबई ते पुणे हे अंतर कमी वेळात पार करणारी एकच ट्रेन महाराष्ट्राकडे सध्यास्थितीतीत आहे. ही ट्रेन म्हणजे दख्खनची राणी अर्थातच डेक्कन क्विन (Deccan Queen ). ही ट्रेन मुंबई ते पुणे हा प्रवास 3.10 तासात पूर्ण करते. वंदे भारत ट्रेनबाबत बोलताना एका रेल्वेच्या अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांना सांगितले की, आम्ही या ट्रेन सुरु करण्याचा निर्णय घेतला कारण या ट्रेनमध्ये चेअर कार्स आहेत. तसेच, दोन शहरांदरम्यान असलेल्या मार्गावर त्या अत्यंत सुरळीत चालवता येऊ शकतात. (हेही वाचा, खुशखबर! आता मुंबई ते पुणे, नाशिक प्रवास फक्त 2 तासांत; वंदे भारत च्या धर्तीवर धावणार हाय स्पीड MEMU ट्रेन, जाणून घ्या वैशिष्ठ्ये)

भारतीय रेल्वे मंत्रालय 2023 पर्यंत वंदे भारत ट्रेनचा दुसरा टप्पा वातानुकुलीत स्लिपर कोचसह (AC sleeper) सुरु करणार आहे. जो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) मुंबई ते फिरोजपूर कॅन्टोन्मेंट रेल्वे स्टेशन पंजाबपर्यंत करण्याचा विचार आहे. आम्ही मुंबई आणि पंजाब दरम्यान एसी स्लीपर वंदे भारत ट्रेन चालवण्याची योजना आखत आहोत. सध्या, दोन राज्यांमधील प्रवास करण्यासाठी सुमारे 33 तास लागतात, जे मोठ्या प्रमाणात कमी केले जातील, असे मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले.