Maharashtra Flood 2019: राजकारण मध्ये न आणता पूरग्रस्तांच्या पाठीशी उभे रहा - उद्धव ठाकरे
Shiv Sena (Photo Credits: Twitter)

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली भागासोबतच कोकणामध्ये पूराची स्थिती भयंकर आहे. यामध्ये आता पावसाचा जोर थांबल्यानंतर मदतकार्याचा ओघ वाढला आहे. यामध्ये शिवसेना देखील राजकारण बाजूला सारून पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचं आज उद्धव ठाकरे यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहे. पूरामुळे सध्या वाहतूक विस्कळीत आहे. त्यामुळे जसे महामार्ग उघडतील तशी मदत वाढवली जाईल असं आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शिवसाहित्य मदतीचे ट्रक आणि अँब्युलन्स उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत शिवाजी पार्क येथून रवाना झाले आहेत. सोबतच 100 डॉक्टरांच्या पथकालादेखील रवाना करण्यात आले आहे.  Maharashtra Flood 2019: कोल्हापूर, सांगली भागातील पूरग्रस्तांना तुम्ही कशी मदत करू शकाल?

पूरस्थितीदरम्यान बचावकार्य आणि मदतकार्यावर अधिक लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून संकटकाळी पूरग्रस्तांना मदत करा असं आवाहन त्यांनी केलं आहे. तसेच पूराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील निवडणूका पुढे ढकलाव्यात का? असा प्रश्न विचारताच उद्धव ठाकरे यांनी, संकटकाळी निवडणूकांचा विचार डोक्यात कसा येऊ शकतो? असं म्हणून राज ठाकरेंना टोला लगावला आहे. Maharashtra Flood 2019: महाराष्ट्र पूर परिस्थिती पाहता विधानसभा निवडणूक पुढे ढकला, राज ठाकरे यांची मागणी

शिवसेनेचं ट्विट

पंचगंगेच्या पातळीत कमालीची घट होत असून पाणी ओसरु लागले आहे. आज कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 249 गावांमधून 50 हजार 594 कुटुंबातील 2 लाख 45 हजार 229 व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. तर  शिरोळ तालुक्यातील 42 गावामधून 31 हजार 38 कुटुंबातील 1 लाख 55 हजार 186 व्यक्तींना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे.