Maharashtra Flood: राज्यात पुरामुळे 112 जणांचा मृत्यू, 99 जण बेपत्ता तर 1.35 लाख लोकांना सोडावे लागले घर
Sangli Flood Relief ( Photo Credits: Twitter)

Maharashtra Flood:  महाराष्ट्रात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे राज्यातील बहुतांश ठिकाणी पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पुरात 112 जणांचा मृत्यू झाला असून 99 जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर मदत आणि पुर्नविकास विभागाने शनिवारी रात्री ही माहिती देत असे म्हटले की, पुरातून नागरिकांचा जीव वाचवण्याचे काम मोठ्या प्रमाण सुरु आहे. राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 1 लाख 35 हजार लोकांना पुराच्या भागातून सुखरुप बाहेर काढण्यात आले.

मदत आणि पुर्नविकास विभागाने म्हटले की, 112 जणांचा मृत्यू झाला असून 3321 गुरांचा पुरात बळी गेला आहे. 53 जण लोक जखमी झाले आहेत. तसेच सांगली आणि रायगड सारख्या जिल्ह्यात झालेला पाऊस आणि भूस्खलनामुळे फार मोठे नुकसान झाले आहे. सांगली जिल्ह्यात काही परिसर पूर्णपणे पाण्यााखाली गेले आहेत. रस्ते आणि शेती सर्व ठिकाणी पाणी शिरले आहे. स्थानिकांचे बचाव कार्य सुद्धा एनडीआरएफ कडून पार पाडले जात आहे. राज्यात एकूण 34 एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.(Mahad, Raigad Landslide: महाड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा निधी 2 दिवसांत वितरीत होणार; एकनाथ शिंदे यांची घोषणा)

Tweet:

तर एनडीआरएफच्या विभागाने असे म्हटले आहे की, महाराष्ट्रातील रत्नागिरी, रायगड आणि सातारा जिल्ह्यात बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. तसेच एनडीआरएफच्या टीम मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पालघर, रायगड, सांगली, सिंधुदुर्ग नगर आणि कोल्हापूर मध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. कोलकाता आणि वडोदरा येथून आणि काही एनडीआरएफची पथके पाठवली जात आहेत.