Representational Image (Photo Credit: File Photo)

मुंबई अहमदाबाद महामार्गावर (Mumbai-Ahmedabad National Highway) शुक्रवारी दुपारी झालेल्या अपघातात सहा जण ठार तर दोघे जखमी झाले. हा अपघात डहाणू (Dahanu Taluka) तालुक्यातील आंबोली (Amboli) येथे झाला. जखमी अवस्थेत असलेल्या तिघांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोन कार आणि एक मोटारसायकल यांच्यात झालेल्या धडकेमुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

अपघातातील मृतांची नावे आणि त्याबाबतची इतर माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकली नाही. तसेच, अपघातात मृत पावलेल्या व्यक्ती या एकाच कुटुंबातील आहेत की वेगवेळ्या कुटुंबातील हे लोक आहेत याबाबत ही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. (हेही वाचा, लातूर भीषण अपघात : कारच्या धडकेत एकाच कुटुंबातील पाच जण ठार, सुदैवाने वाचले चिमुकलीचे प्राण)

एएनआय ट्विट

दरम्यान, अपघाताची माहती कळताच स्थानिकांनी घटनास्थली धाव घेतली. स्थानिकांनीच पोलिसांशी संपर्क करुन घडल्या प्रकाराची माहिती दिल्याचे समजते.