केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात (Agriculture Laws) दिल्लीच्या सीमेवर जवळपास दीड महिन्यापासून शेतकरी आंदोलन करत आहेत. कृषी कायदा रद्द करा, अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे. या अंदोलनास आता महाराष्ट्रातील (Maharashtra) शेतकऱ्यांनीही पाठिंबा दर्शवला आहे. यामुळे अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात नाशिक येथून निघालेले हजारो शेतकरी उद्या राजभवनावर धडकणार आहेत. या शेतकरी आंदोलनास महाविकासआघाडी सरकारचा (Maha Vikas Aghadi) पाठिंबा आहे. तसेच कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.
आझाद मैदानात शेतकऱ्यांचे 3 दिवसांचे धरणे आंदोलन असणार आहे आंदोलक शेतकऱ्यांसाठी मैदानात भव्य मंडप उभारण्यात आलेला आहे. आंदोलक शेतकरी राज्यपालांना निवेदन सादर करणार आहेत. शिवाय, 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिनी आझाद मैदानात ध्वजारोहणही केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधील शेतकरी मोठ्या संख्येने या महामोर्चात सहभागी झालेले आहेत. हे देखील वाचा- Kisan Morcha: अखिल भारतीय किसान सभेच्या विराट मोर्च्याला NCP शरद पवारही उपस्थित राहणार
एएनआयचे ट्वीट-
Maharashtra: Farmers from Nashik camp at Azad Maidan in Mumbai.
They have marched from Nashik to Mumbai in support of farmers agitating against three agriculture laws at Delhi borders. pic.twitter.com/4L1HMOsYEK
— ANI (@ANI) January 24, 2021
हे कायदे करून शेतकऱ्यांचे भले होणारे आहे. शेतकऱ्यांना चांगली किंमत मिळावी आणि त्यांच्या मालाला लवकरात लवकर गिऱ्हाईक मिळावे यासाठी या सुविधा केल्या जात असल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. परंतु, केवळ उद्योगांचे भले करण्यासाठी आणि राज्य सरकारला कमी लेखण्याच्या केंद्र सरकार प्रयत्न करत आहे, असे या कायद्याला विरोध करणारे म्हणत आहेत.