NCP Chief Sharad Pawar (Photo Credits PTI)

शेती कायद्यांविरोधातील शेतक-यांचे आंदोलन (Farmers Agitation) आता मुंबईतही येऊन धडकलय. येत्या 26 जानेवारीला अखिल भारतीय किसान सभेचा विराट मोर्चा राजभवनावर धडकणार आहे. या मोर्च्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) स्वत: उपस्थित राहणार आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील पक्षातील प्रमुख नेत्यांसह उपस्थित राहणार आहेत. 26 जानेवारीला सकाळी 11 वाजता केंद्र सरकारच्या या धोरणाला विरोध केल्यानंतर हा मोर्चा राजभवनाच्या दिशेला कूच करणार आहे. अखिल भारतीय किसान सभेच्या (All India Kisan Sabha) नाशिकहून निघालेले आंदोलक मुंबईतील आझाद मैदानात दाखल झाले आहे.

या मोर्चामध्ये ट्रॅक्टर, जीप इत्यादी वाहनांसह हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. या मोर्चाद्वारे केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करण्यात येणार आहे.हेदेखील वाचा- Farmer Laws: कृषी कायद्याच्या विरोधात ऑल इंडिया किसान सभेच्या नेतृत्वात आंदोलक शेतकऱ्यांची नाशिक येथून मुंबईकडे कूच (Watch Video)

केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन कृषी कायद्याविरोधात गेल्या 60 दिवसांपासून दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सबंध महाराष्ट्रातील शेतकरी मुंबई येथे येऊन आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाला आता शरद पवारांनी देखील पाठिंबा दिला आहे.

दुस-या बाजूला 26 जानेवारी राजपथावर दिल्लीच्या सीमेवर (Delhi Border) आपल्या अन्नदात्याची म्हणजेच शेतक-यांची ट्रॅक्टर परेड पाहायला मिळणार आहे. या परेडकरिता पोलिसांकडून परवानगी मिळावी अशी शेतक-यांनी पोलिसांकडे मागणी केली होती. मुंबईच्या दिशेने निघालेल्या लाल वादळावर पोलिसांकडून ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे.  या आंदोलनात भाजप वगळता अन्य पक्षातील  नेते  सहभागी होण्याची शक्यता आहे.