धक्कादायक! जालना येथे आर्थिक अडचणींमुळे एका नवविवाहित दाम्पत्याची गळफास लावून आत्महत्या
Hang | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना संकट घोंगावत असताना जालना (Jalna) येथून लध वेधून घेणारी घटना घडली आहे. आर्थिक अडचणींमुळे एका नवविवाहित दाम्पत्याने गळफास लावून आत्महत्या (Couple Commits Suicide) केली आहे, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही घटना जालना तालुक्यातील घोडेगाव परिसरात आज सकाळी घडली आहे. स्थानिक पोलिसांनी या दोघांचाही मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. या दाम्पत्याचे गेल्या 2 वर्षांपूर्वीच यांचे लग्न झाले होते. परंतु, गेल्या काही दिवासांपासून ते आर्थिक अडचणींचा सामना करत होते. या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

सुरेश फकिरराव खांडेभराड आणि अनिता सुरेश खांडेभराड, अशी आत्महत्या केलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. सुरेश आणि अनिता यांचे गेल्या 2 वर्षापूर्वी लग्न झाले होते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून त्यांना आर्थिक अडचणींच्या सामोरे जावे लागत होते. याच नैराश्यातून सुरेश आणि अनिताने आज सकाळी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघकीस आली आहे. मृतांच्या शेजारी कोणतीही सुसाईट नोट सापडली नाही. तसेच स्थानिक पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेमुळे आजूबाजुच्या परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. हे देखील वाचा-ठाणे येथील घोडबंदर रोडवर कार झाडाला आदळून भीषण अपघात; एकाचा मृत्यू, 3 जण जखमी

ट्वीट-

रविवारी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांनी आपल्या वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येच्या बातमीने संपूर्ण सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली होती. सुशांतच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप समोर आले नाही. त्याने मानसिक तणावाखाली आत्महत्या केली आहे, अशी महिती समोर आली आहे.