Maharashtra Environment Minister Aaditya Thackeray | (Photo Credits: ANI)

अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यातील सर्वाधिक फटका महाड आणि चिपळूणला बसल्याने आज केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे (Narayan Rane), विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी कोकणातील पूरग्रस्त भागाची पाहाणी केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली.

मातोश्रीचा दरवाजा बंद होता. हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असल्याप्रमाणे ते अॅडमिट होते. आज सकाळी त्यांना डिस्चार्ज मिळाला. ते थेट चिपळूणला आले. काय मुख्यमंत्री? कसली संवेदना? हे सर्व झाल्या झाल्या त्यांनी पाहाणीसाठी यायला हवे होते, अशी टीका नारायण राणे यांनी केली होती. यावर आदित्य ठाकरे यांनी आपल्या शैलीत प्रत्युत्तर दिलं आहे. ('मुख्यमंत्री येताना कोरोना घेऊन आले, राज्यातील वादळे, पाऊस, विषाणू हा त्यांचाच पायगुण'; Minister Narayan Rane यांचा हल्लाबोल)

आदित्य ठाकरे म्हणाले की, "जर तुम्ही विरोधकांकडे लक्ष देत असाल तर ते आमच्यासाठी इतके महत्त्वाचे नाही.आपल्या सर्वांचे काम राजकारणापलिकडे आहे. ही जनतेच्या पाठीशी उभे राहण्याची वेळ आहे."

ANI Tweet:

नागरिकांना वेळीच सुरक्षित स्थळी हलवायला हवं होतं. सर्व व्यवस्था करायला हवी होती. जी आता भाजप करतं आहे. पाठांतर करुन यायाचं आणि  बोलायचं. राज्याल मुख्यमंत्री नाही आणि प्रशनासही नाही, अशी भीषण परिस्थिती असल्याची टीकाही त्यांनी पत्रकारांशी  बोलताना केली होती. दरम्यान, तळीये गावातील दुर्घटनाग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेतून घरं बांधून देण्याचे आश्वासन राणे यांनी यावेळी दिले आहे.