Exit Poll Results | File Image

महाराष्ट्रामध्ये आज (21 ऑक्टोबर) विधानसभा निवडणूक 2019 साठी मतदान पार पडले आहे. आज मतदारांमध्ये मतदानाबद्दल उदासीनता पहायला मिळाली आहे. महाराष्ट्रामध्ये आज एकूण 55.33 % मतदान पार पडले आहे. या निवडणूक मतदानाची वेळ पार पडल्यानंतर आता एक्झिट पोल जाहीर होण्यास सुरूवात झाली आहे. इंडिया टुडे (आज तक) आणि माय एक्सिस इंडियाने केलेल्या सर्वेक्षणानुसार राज्यात पुन्हा भाजपा- शिवसेनेची सत्ता येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सत्तेच्या चाव्या पुन्हा भाजपा- शिवसेना युतीकडे येण्याची शक्यता आहे.

2014 मध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक 122 जागा, शिवसेनेस 63, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला 42 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या होत्या. राज्यातील विधानसभा निवडणूकीचा निकाल 24 ऑक्टोबर दिवशी लागणार आहे. Maharashtra Election 2019 India Today-Axis My India Exit Poll Results Live Streaming: 'इंडिया टुडे-अ‍ॅक्सिस माय इंडिया'चा कौल पहा कुणाच्या बाजुने?

इंडिया टुडे आणि माय अ‍ॅक्सिस इंडियाचा निकाल काय सांगतो?

भाजपा : 109-124

शिवसेना: 57-70

कॉंग्रेस: 32-40

राष्ट्रवादी कॉंग्रेस: 40-50

वंचित: 0-2

आता हे एक्झिट पोलचे कौल आणि अंदाज खरे ठरतात का? हे पाहण्यासाठी मतदारांना 24 ऑक्टोबरची वाट पहावी लागणार आहे. 24 ऑक्टोबरला सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. महराष्ट्रामध्ये 288 विधानसभा जागांवर मतदान पार पडले आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी 145 चा जादूई आकडा गाठण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.