Maharashtra Diwali 2020 Bumper Lottery Result: 'महाराष्ट्र दिवाळी भव्यतम सोडत' निकाल आज संध्याकाळी lottery.maharashtra.gov.in वर होणार जाहीर; कशी पाहाल विजेत्यांची यादी?
लॉटरी/ प्रतीकात्मक (Photo Credits: Getty Images)

Maharashtra Diwali 2020 Bumper Lottery Result: दिवाळी सणानिमित्त जाहीर करण्यात आलेल्या लॉटरीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. यावर्षीदेखील दिवाळी बंपर लॉटरीमध्ये (Maharashtra Diwali 2020 Bumper Lottery) महाराष्ट्र राज्य सरकारची 'महाराष्ट्र दिवाळी भव्यतम सोडत', डिअर दिवाळी बंपर लॉटरी आणि राजश्री 1000 या सोडतीच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. यातील 'महाराष्ट्र दिवाळी भव्यतम सोडत' निकाल आज संध्याकाळी lottery.maharashtra.gov.in वर होणार जाहीर होणार आहे. तर राजश्री 1000 चा 25 नोव्हेंबरला जाहीर करण्यात येणार आहे. तुम्हीही महाराष्ट्र दिवाळी भव्यतम सोडत लॉटरीचं तिकीट काढलं असेल तर तुम्ही आज संध्याकाळी याचा निकाल पाहू शकता. तुम्ही खालील पद्धतीने या लॉटरीचा निकाल ऑनलाईन पाहू शकता.

तुम्हीही आजच्या लॉटरीचं तिकीट काढलं असेल तर आज नेमका ऑनलाईन निकाल कसा बघायचा हा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना? आज संध्याकाळी lottery.maharashtra.gov.in या सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला हा निकाल पाहता येणार आहे. या दिवसाच्या निमित्ताने पहिले बक्षीस 1 कोटी, दुसरं बक्षीस 5 लाखांची 5 अशी 25 लाख आणि अन्य 10 लाख, 2 लाखाची बक्षीसं जाहीर केली जाणार आहेत. (हेही वाचा - Maharashtra Diwali 2020 Bumper Lottery and Prize List: राजश्री 1000 चा 25 नोव्हेंबरला; कसा पहाल निकाल?)

महाराष्ट्र दिवाळी भव्यतम सोडत निकाल ऑनलाईन कसा पहाल?

  • lottery.maharashtra.gov.in ओपन करा.
  • त्यानंतर 'लॉटरी निकाल' या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यापुढे 'महाराष्ट्र दिवाळी भव्यतम सोडत निकाल' वर क्लिक करा.
  • यानंतर लॉटरीच्या नावांप्रमाणेच तुम्ही ज्या लॉटरीचं तिकीट काढलं आहे त्यावर क्लिक करा.
  • पीडीएफ स्वरूपातील एक फाईल ओपन होईल.
  • या पीडीएफ फाईल स्वरूपातील निकालामध्ये प्रत्येक लॉटरीच्या विजेत्याचा क्रमांक तुम्हांला पाहता येऊ शकतो.

दरम्यान, महाराष्ट्र दिवाळी भव्यतम सोडत निकालाशिवाय राजश्री 1000 या लॉटरीचा निकाल 25 नोव्हेंबरला लागणार आहे. ही लॉटरी मिझोराम सरकारची आहे. परंतु, महाराष्ट्रातदेखील त्याची तिकीट विक्री केली जाते. तुम्ही यासंदर्भात bookmyrajshree.com या वेबसाईटवर अधिक माहिती मिळवू शकता.