Maharashtra Diwali 2020 Bumper Lottery and Prize List: महाराष्ट्र दिवाळी भव्यतम सोडत निकाल 17 नोव्हेंबर तर राजश्री 1000 चा 25 नोव्हेंबरला; कसा पहाल निकाल?
लॉटरी/ प्रतीकात्मक (Photo Credits: Getty Images)

दिवाळीच्या दिवसांत अनेकांचे लक्ष या सणानिमित्त जाहीर केल्या जाणार्‍या दिवाळी बंपर लॉटरीच्या निकालांकडे लागलेले असते. यावर्षीदेखील दिवाळी बंपर लॉटरीमध्ये (Maharashtra Diwali 2020 Bumper Lottery) महाराष्ट्र राज्य सरकारची 'महाराष्ट्र दिवाळी भव्यतम सोडत', डिअर दिवाळी बंपर लॉटरी आणि राजश्री 1000 या सोडतीच्या निकालांकडे लागले आहे. दिवाळी हा सणांचा राजा असल्याने या सोडतीमध्ये लाखो-करोडो रूपयांची बंपर बक्षीसं जाहीर केली जातात. मग तुम्ही देखील दिवाळीनिमित्त अशी लॉटरीची तिकिट काढली असेल तर पहा कोणत्या लॉटरीचा निकाल कधी, कुठे आहे? तुम्ही घरबसल्या तो कसा पाहू शकाल? DEAR DIWALI BUMPER Lottery 2020: डिअर दिवाळी बंपर लॉटरी निकाल यंदा 14 नोव्हेंबरला; तिकीट दर, बक्षिसाची किंमत आणि निकाल कसा पहाल?

महाराष्ट्र दिवाळी भव्यतम सोडत

महाराष्ट्र राज्यात 'महाराष्ट्र दिवाळी भव्यतम सोडत' ही यंदा 17 नोव्हेंबर दिवशी जाहीर केली जाणार आहे. म्हणजे तुम्हांला निकाल 17 नोव्हेंबरच्या रात्री पाहता येणार आहे. या दिवसाच्या निमित्ताने पहिले बक्षीस 1 कोटी, दुसरं बक्षीस 5 लाखांची 5 अशी 25 लाख आणि अन्य 10 लाख, 2लाखाची बक्षीसं जाहीर केली जाणार आहेत. हा निकाल ऑनलाईन देखील पाहता येणार आहे.

राजश्री लॉटरी

राजश्री 1000 ही लॉटरी मिझोराम सरकारची आहे. परंतू महाराष्ट्रातही त्याची तिकीट विक्री केली जाते. दिवाळी निमित्त जाहीर केल्या जाणार्‍या सोडतींमध्ये 50 लाखांची 5 म्हणजेच 2.5 कोटीची बक्षीसं जिंकत येणार आहेत. 1990 पासून अस्तित्त्वामध्ये असलेल्या या लॉटरीच्या तिकिटांनाही अनेकांची पसंती असते. यंदा दिवाळी स्पेशल राजश्री तिकिटाची सोडत 25 नोव्हेंबरला आहे. निकाल संध्याकाळी 8.30 वाजता जाहीर केला जाणार आहे. तिकिट दर 1000 रूपये असून त्याची होम डिलेव्हरी केली जाते. दरम्यान अधिक माहिती तुम्हांला bookmyrajshree.com वर पाहता येणार आहे.

दिवाळीमध्ये धनतेरस, लक्ष्मीपूजन या महत्त्वाच्या दिवशी घरातील आर्थिक भरभराटीसाठी प्रार्थना करण्याची प्रथा आहे. त्यानिमित्ताने घरोघरी पूजा केली जाते. व्यापारी लोक देखील चोपडा पूजन करून नवं वर्ष सुरू करण्यासाठी सज्ज होतात.