Coronavirus | Representational Image (Photo Credits: Pixabay)

राज्यात आज कोरोनाच्या 154 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आजच्या दिवशी 172 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. शनिवारी राज्यात दोन रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 98.17 टक्क्यांवर पोहोचलं आहे तर मृत्यू दर हा 1.81 टक्के इतका आहे. तर JN 1 व्हेरियंटच्या (JN.1 Sub-Variant) रुग्णांची संख्या ही 139 इतकी झाली आहे. राज्यात शनिवारी कोरोनाच्या 14,790 चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 2,421 इतक्या आरटीपीसीआर चाचण्या होत्या तर 12,369 इतक्या चाचण्या या RAT चाचण्या आहेत. राज्याचा कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट हा 1.04 टक्के इतका आहे.  (हेही वाचा - Covid Task Force On Self-Isolation: कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यास पाच दिवस स्वत:हून विलगीकरण स्वीकारा- टास्क फोर्स)

कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटमुळे  केंद्र सरकारने आधीच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. राज्यात सर्वाधिक रुग्ण पु्ण्यात आढळले आहे. पुण्यात एकूण 91 रुग्ण असून त्या खालोखाल नागपूरमध्ये 30 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्या खालोखाल ठाण्यामध्ये 5 तर बीडमध्ये 3, छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 आणि नांदेडमध्ये 2 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान नव्या कोरोना व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर लवकरच औषधोपचारासंदर्भात टास्क फोर्स क्लिनिकल प्रोटोकॉल जाहीर करणार आहेत. तुमची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली असेल तर घाबरून जाण्याचे कारण नाही. फक्त काळजी घ्या आणि स्वत:हून आपल्याच घरी विलगीकरण स्वीकारा. खास करुन घरामध्ये वृद्ध लोक असतील तर मास्क वापरा. तसेच, दोन व्यक्तींमध्ये आवश्यक अंतर ठेवा, असा सल्ला कोविड टाक्स फोर्सने दिला आहे.