तुमची कोरोना व्हायरस (Coronavirus) चाचणी पॉझिटीव्ह (Corona Tests Positive) आली असेल तर घाबरून जाण्याचे कारण नाही. फक्त काळजी घ्या आणि स्वत:हून आपल्याच घरी विलगीकरण (Home Isolation) स्वीकारा. खास करुन घरामध्ये वृद्ध लोक असतील तर मास्क वापरा. तसेच, दोन व्यक्तींमध्ये आवश्यक अंतर ठेवा, असा सल्ला कोविड टाक्स फोर्सने (COVID Task Force) दिला आहे. पाठिमागील 15 दिवसांमध्ये ख्रिसमस आणि नववर्ष जल्लोष अशा कार्यक्रमांमुळे मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र आले. त्यामुळे राज्य आणि देशांमध्ये कोरोना व्हायरस संसर्ग वाढला. सहाजिकच कोरोना संक्रमितांची संख्या वाढली. त्यामुळे पुढचे 15 दिवस महत्त्वाचा आहेत, असेही टास्क फोर्सने म्हटले आहे.
कोरोना आयसोलेशन धोरण
राज्यातील कोरोना टास्क फोर्सने वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (3 जानेवारी) आयसोलेशन बाबत एक धोरण जारी केले. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, या धोरणात कोरोना संक्रमितांची संख्या वाढल्यास आवश्यक चाचणी, लसीकरण याबाबत माहिती देण्यात आली. दरम्यान, कोविड रुग्ण वाढल्यास काय करावे आणि काय करु नये, याबाबत राज्य सरकार एक मार्गदर्शक सूचना गुरुवारपर्यंत काढण्याची शक्यता आहे. प्रदीर्घ काळासाठी स्थिर असलेली कोरोना रुग्णांची संख्या डिसेंबर महिन्यात काहीशी वाढल्याची निरिक्षण टास्क फोर्सने नोंदवले. तसेच, जेएन-वन (JN.1) हा कोरोनाचा नवा व्हेरीएंटही समप्रमाणात वाढतो आहे. मात्र, रुग्णालयात हे रुग्ण वाढत असले तरी मृत्यूचे प्रमाण त्या प्रमाणात कमी असल्याचेही निरिक्षण पुढे आले आहे. दरम्यान, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर महिन्यात कोरोना संसर्गामुळे तीन मृत्यू झाले आहेत. (हेही वाचा, Covid-19: देशात एका दिवसात 636 कोरोनाबाधित, थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाच्या गर्दीमुळे संसर्ग वाढला)
''राज्यातील कोरोना स्थिती स्थिर आणि नियंत्रणात''
राज्यातील कोरोना स्थिती सध्या स्थिर आणि पूर्णपणे नियंत्रणात आहे. मात्र, असे असले तरी पुढचे दोन आठवडे महत्त्वाचे आहेत. त्यामळे आम्ही नागरिकांना सावधानतेचा आणि काळजी घेण्याचा सल्ला देतो. कारण मागच्या काही दिवसांमध्ये लोक मोठ्या प्रमाणावर एकत्र आले होते, असे टाक्स फोर्सचे सदस्य आणमि महाराष्ट्र विद्यापीठातील डॉ. मुरलीधर काणीटकर यांनी म्हटले आहे. जर एखाद्या व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आलीच असेल तर न घाबरता त्यांनी स्वत:च्याच घरी किमान पाच दिवस स्वत:हून विलगीकरण स्वीकारावे, असा सल्ला आम्ही त्यांना देतो असेही ते म्हणाले. (हेही वाचा, Bengaluru Covid JN.1 Variant: चिंता वाढली! बेंगळुरूच्या सांडपाण्यात आढळला कोविड-19 चा जेएन.1 प्रकार; नमुन्यांमध्ये आढळली 96 टक्के सकारात्मकता)
ख्रिसमस, न्यू ईयर सेलिब्रेशनमुळे संसर्गात वाढ
दरम्यान, टास्क फोर्सच्या आणखी एका सदस्याने सांगितले की, डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातझालेल्या तपासणीमध्ये राज्यातील कोरोना संक्रमितांची संख्या 35 पटींनी वाढली आहे. डिसेंबर महिन्याच्याय पहिल्या आठवड्यात कोरोनाचे नोंदिवल्या गेलेल्या कोरोना संंक्रमितांसह तो एकूण आकडा 701 वर पोहोचला. ज्यामध्ये JN.1 व्हेरिएंटच्या 21 रुग्णांचा समावेश होता. मात्र, असेअसले तरी घाबरण्याचे कारणनाही, बहुतांश रुग्णांची आरोग्य स्थिती अगदी सामन्य आहे.
राज्य सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यभरात बुधवारी (3 जानेवारी) 138 नवीन कोरोना संक्रमित आढळले. राज्यात सध्यास्थितीत सक्रिय कोरोना संक्रमितांची संख्या 862 इतकी आहे. त्यापैकी 3% रुग्ण रुग्णालयात आहेत. नऊ जन रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (आयसीयू) तर उर्वरित 765 होम आयसोलेशनमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.