Delta Plus कोरोना व्हायरस (Coronavirus) व्हेरीएंट राज्य आणि देशासमोर चिंता वाढवण्यीच शक्यता असतानाच महाराष्ट्रातून एक दिलासादायक वृत्त येत आहे. राज्यातील कोरोना व्हायरस (Covid 19) संक्रमितांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी होताना दिसत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने आज (शुक्रवार, 25 जुन) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात आज 9,677 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला. तर 10,138 जण उपचार घेऊन बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. 156 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले. ही आकडेवारी पाठिमागील 24 तासांमधील आहे. संपूर्ण आकडेवारीवर नजर टाकता गेल्या काही दिवसांमधील ही सर्वात कमी संख्या आहे. तसेच, कोरोना संक्रमितांपेक्षाही उपचार घेऊन बरे होणाऱ्यांची संख्या अधिक वाढली आहे. मुंबई शहरातही कोविड संक्रमितांची आणि मृत्यूंची संख्या मोठ्या प्रमाणावर घटत आहे. मुंबई महापालिकेने (BMC) दिलेल्या आकडेवारीवरुन हे वास्तव पुढे येत आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात सध्यास्थितीत कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 60,17,035 इतकी झाली आहे. त्यापैकी 57,72,799 जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत राज्यातील एकूण कोरोना संक्रमित मृतांची संख्या 1,20,370 इतकी आहे. राज्यात आज रोजी सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 1,20,715 इतकीआहे. दरम्यान, राज्यातील मृत्यूदर अद्यापही (2%) स्थिरच आहे. (हेही वाचा, Delta Plus Variant in Maharashtra: महाराष्ट्रात डेल्टा प्लस संक्रमित रुग्णाचा पहिला मृत्यू रत्नागिरी जिल्ह्यात)
संपूर्ण महाराष्ट्रासोबतच राजधानी मुंबई शहरातूनही दिलासादायक वृत्त आहे. मुंबई शहरातही कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटताना पाहायला मिळते आहे. मुंबईत आज दिवसभरात 693 जण कोरोना संक्रमीत झाले. 575 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंईत सध्यास्थितीत 10437 जणांवार उपचार सुरु असल्याची माहती मुंबई महापालिकेने दिली आहे.
मुंबई महापालिकेने दिलेल्या आज (25 जून) सायंकाळी सहा वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार 24 तासात 693 जण कोरोना व्हायरस संक्रमित आढळले. 575 रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. मुंबई शहरातील एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 692245 इतकी झाली आहे. मुंबई शहरातील बरेहोणाऱ्या कोरोना संक्रमितांचे प्रमाण 95% इतके आहे. मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या आहे 10437. कोरोना रुग्णांच्या दुप्पटीचा दर- 713 दिवसांवर पोहोचला आहे. कोविड वाढीचा दर ( 18 जून ते 24 जून)- 0.09 % इतका राहिला आहे.