Lockdown काळात महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या वतीने स्थलांतरीत मजूरांच्या मदतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात हेल्पलाईन सुरू; 'हे' आहेत क्रमांक
Image For Representation (Photo Credits-Facebook)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊन (Lockdown) मध्ये परराज्यात अडकून पडलेल्या कामगारांची अवस्था बिकट झाली होती. या मजूर व कामगारांना आपल्या घरी पाठवण्यासाठी आता श्रमिक स्पेशल ट्रेन्सच्या (Shramik Special Train) माध्यमातून काम केले जात आहे. मात्र या ट्रेनचे तिकीट मिळवण्यापासून ते प्रवास करण्यासाठी लागणारे मेडिकल सर्टिफिकेट मिळवेपर्यंत अनेक कामांसाठी अजूनही अनेकांना अडचणी येत आहेत. या तांत्रिक अटी पूर्ण करण्यासाठी या मजुरांना मदत पुरवण्याचे काम आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे करण्यात येत आहे. महाराष्ट्र काँग्रेस (Maharashtra Congress) कडून प्रत्येक जिल्ह्यात काही हेल्पलाईन क्रमांक सुरु करण्यात आले आहेत या क्रमांकांवर संपर्क करून मजूर विविध कामांसाठी असिस्टंस मिळवू शकता. याशिवाय अन्यही काही अडचणी असल्यास त्यावर उत्तर मिळवण्यासाठी या क्रमांकांवर संपर्क करता येईल. उत्तर प्रदेश च्या मिहौली राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, 23 मजूर ठार तर 15 जण गंभीर जखमी

श्रमिक स्पेशल ट्रेन सुरु झाल्यापासून वेगवेगळ्या कागदपत्रांसाठी तसेच मेडिकल तपासण्या करून घेण्यासाठी कामगारांनी गर्दी केली होती. डोंबिवली, मुंबई मधील समता नगर परिसर, सिंधुदुर्ग या ठिकाणी तर अति गर्दीचे प्रसंग सुद्धा घडले होते. या कामगारांच्या मदतीसाठी काँग्रेसने आता हे पाउल उचलले आहे. यापूर्वी सुद्धा लॉक डाऊन काळात कामगारांच्या हक्कांसाठी केंद्रीय स्तरावर काँग्रेसने अनेक मागण्या लावून धरल्या होत्या आता राज्य आणि जिल्हा स्तरावर हे काम केले जात आहे.

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटी तर्फे कामगारांसाठी सुरु करण्यात आलेले हेल्पलाईन क्रमांक

दरम्यान, आज सकाळीच महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशाकडे निघालेल्या 5 स्थलांतरित कामगारांचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. प्रवासावेळी ट्रक उलटला गेल्याने हा दुर्देवी अपघात घडला. या आधी सुद्धा घरी जाण्याच्या घाईत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. हे प्रसंग टाळण्यासाठी श्रमिक स्पेशल ट्रेन सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.