मध्यप्रदेश: महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशात जाण्यासाठी निघालेल्या 5 स्थलांतरित कामगारांचा रस्ते अपघातात मृत्यू
Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे लॉकडाउनचे आदेश जाहीर करण्यात आले आहेत. परंतु लॉकडाउनच्या काळात हातावर पोट असणाऱ्या कामगार आणि मजूर वर्गाला याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या घरची वाट पकडली असून काही जणांनी पायी चालत जाण्याचा निर्धार केला आहे. मात्र सरकारने आता श्रमिक स्पेशल ट्रेनच्या माध्यमातून स्थलांतरित कामगारांना त्यांच्या घरी पोहचवण्याची सोय केली आहे. तरीही काही जण अद्याप पायी चालत जाताना दिसून येत आहे. याच दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून स्थलांतरित कामगरांच्या अपघाती घटना समोर येत आहे. आता महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशाकडे निघालेल्या 5 स्थलांतरित कामगारांचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

आज सकाळीच उत्तर प्रदेशात अपघाती मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना अजून एक घटना घडली आहे. महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशाकडे निघालेले स्थलांतरित कामगार एका ट्रकमधून प्रवास करत होते. मात्र प्रवासावेळी ट्रक उलटला गेल्याने हा दुर्देवी अपघात झाला असून 5 जणांनी यामध्ये आपला जीव गमावला आहे. ही घटना बांदा (सागर जिल्हा) येथे घडल्याची माहिती एसीपी प्रविण भुरिया यांनी माहिती दिली आहे.(Coronavirus Update: भारतात कोणत्या राज्यात आहे किती कोरोना रुग्ण, जाणून घ्या आजचे ताजे अपडेट्स एका क्लिकवर)

दरम्यान, आज सकाळी उत्तर प्रदेशातील अपघातात मृत्यू पावलेल्या मृतांच्या परिवाराला 2 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे. तसेच अपघातात जखमी झालेल्यांना 50 हजार रुपयांची मदत केली जाणार असून उत्तर प्रदेशाचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी स्पष्ट केले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या घटनेप्रकरणी दुख व्यक्त केले आहे.