महाराष्ट्रामध्ये आज आषाढी शुक्ल एकदशी दिवशी पंढरपूर मध्ये विठ्ठल- रूक्मिणीची शासकीय पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली आहे. या पूजेमध्ये मानाचे वारकरी म्हणून अहिरे दांम्पत्य सहभागी झाले होते. दरम्यान आजच्या शासकीय पूजेमध्ये तिसर्यांदा एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल-रूक्मिणीची शासकीय पूजा झाली आहे. 'राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव, राज्यातील बळीराजाचे दुःख कष्ट दूर करुन त्याला सुजलाम सुफलाम ठेव. त्याच्या जीवनात सोन्याचे दिवस येऊ दे' असं साकडं विठूरायाच्या चरणी घातलं असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली आहे.
पंढरपूरात सगळीकडे भक्तीमय वातावरण आहे. यावर्षी मागील वर्षीच्या तुलनेत अधिक वारकरी पंढरीत दाखल झाले आहेत. पांडुरंगाच्या आशिर्वादाने राज्याचा कारभार सुरु आहे. या राज्यातील बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, त्याचं पिक चांगलं येऊ दे, चांगला पाऊस येऊ दे शेतकऱ्यांच्या जीवनात सोन्याचे दिवस येऊ दे असं मागणं विठ्ठलाला मागितल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. वारकरी म्हणजेच शेतकरी, कष्टकरी, युवक, ज्येष्ठ यांच्या जीवनात सुखी समाधानाचे दिवस येऊ दे असं साकडं घातल्याचेही ते म्हणाले आहेत. Ashadhi Ekadashi 2024: आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बाळू शंकर अहिरे-आशाबाई बाळू अहिरे या मानाच्या वारकरींसोबत शासकीय महापूजा संपन्न (Watch Video) .
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
#WATCH | Maharashtra CM Eknath Shinde says, "Pandharpur Yatra, the Ashadhi Yatra this time is being organised with great enthusiasm. More of our brothers and sisters have come here than last year. The government and district administration have made arrangements for them...… https://t.co/7YUfnyKAYi pic.twitter.com/KM8fpCh7If
— ANI (@ANI) July 16, 2024
यावेळी विठुरायाच्या चरणी लीन होत राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव, राज्यातील बळीराजाचे दुःख कष्ट दूर करून त्याला सुजलाम सुफलाम ठेव, राज्यात उत्तम पाऊस पडून सर्वांना दिलासा दे एवढेच मागणे याप्रसंगी विठुरायाच्या चरणी मागितले. तसेच गेली तीन वर्षे ज्या प्रामाणिकपणे जनतेसाठी काम… https://t.co/yqiDz58MG1 pic.twitter.com/jI3qB1Xnp4
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 17, 2024
आता पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिरामध्येही तिरुपती बालाजीप्रमाणेच दर्शन मंडप आणि टोकन पध्दत सुरू केली जाणार असल्याचेही शिंदे म्हणाले आहेत. त्यासाठी सरकार 103 कोटींची तरतूद करणार आहे. यामुळे 12-15 तास दर्शनाला रांगेत उभं राहण्याचा वेळ वाचणार आहे.