महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आगामी गणेशोत्सव, दहीहंडी आणि मोहरम या सणांच्या पार्श्वभूमीवर एक बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा घेण्यात आला. या वेळी प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते.