MSBSHSE 12th Science, Arts, Commerce Result 2019: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल आज (28 मे) दिवशी जाहीर करण्यात आला आहे. दुपारी 1 वाजता शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येईल. मात्र तत्पुर्वी शिक्षण मंडळाने पत्रकार परिषद घेऊन निकालाची माहिती दिली आहे. यंदा कोकण विभागाने (Konkan Division) बारावी परीक्षा निकालात बाजी मारली आहे. बारावी परीक्षेला यंदाही मुलांच्या तुलनेत मुलींनी बाजी मारत अव्वल कामगिरी केली आहे. बारावीचा राज्यातील एकूण निकाल 85.88% लागला आहे. यंदा बारावीच्या परीक्षेला एकूण 14,21,936 विद्यार्थी सामोरे गेले. त्यापैकी मुलींचा निकाल 90.25% आणि मुलांचा निकाल 82.40% लागला आहे. 22 विषयांचा निकाल 100% लागला आहे. नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. विज्ञान शाखेचा 92.07%, कॉमर्सचा 88.28 % तर आर्ट्सचा 76.45 % निकाल लागला आहे. 12 वीचा निकाल SMS च्या माध्यामातून BSNL, Tata, Vodafone युजर्स कसा पाहू शकाल?
विद्यार्थ्यांना आज दुपारी एक वाजल्यापासून मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहण्याची सोय आहे. शिक्षण मंडळाच्या वेबसाईटसोबतच काही थर्ड पार्टी वेबसाईटवरही निकाल पाहता येऊ शकतो. विद्यार्थ्यांना मेसेजद्वारा निकाल पाहण्याची सोयदेखील खुली करण्यात आली आहे.
कसा पहाल बारावीचा निकाल?
- mahresult.nic.in ही किंवा वर दिल्यापैकी बोर्डाची कोणतीही अधिकृत वेबसाईट सुरु करा.
-अधिकृत वेबसाईटच्या होमपेजवर Latest Announcement Of the HSC Results चा पर्याय दिसेल.
त्यानंतर HSC Examination Result 2019 वर क्लिक करा
-आता तुम्हांला एका नव्या विंडोवर रिडिरेक्ट केलं जाईल, तिथे तुम्हांला रोल नंबर (Roll Number) आणि आईचं नाव (Mother's Name) टाईप करायचं आहे.
-त्यापुढे View Result वर क्लिक करा
-तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्हांला तुमचा निकाल पाहता येईल
-तुमच्या निकालाची प्रिंट आऊट काढण्याची, सेव्ह करण्याची सोय आहे
विभाग निहाय बारावीचा निकाल किती % ?
कोकण 93.23
मुंबई 83.85
पुणे 87.88
औरंगाबाद 87.29
नागपूर 82.05
कोल्हापूर 87.12
नाशिक 84.77
लातूर 86.08
अमरावती 87.55
यंदा बारावीच्या परीक्षेला 14 लाखाहून अधिक विद्यार्थी सामोरे गेले होते. 21 फेब्रुवारी ते 20 मार्च दरम्यान ही परीक्षा पार पडली. 30-40 हजार शिक्षक यंदा पेपर तपासणीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आले होते.