महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी आज (30 जून) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांची सीबीआय चौकशी करावी, अशा मागणीच पत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना लिहिले आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी या बाबतचा ठराव भाजपच्या प्रदेश कार्यसमितीने घेतला होता त्यानंतर आता हे पत्र पाठवण्यात आले आहे. सध्या मनसुख हिरेन प्रकरणात NIA च्या अटकेत असलेले माही मुंबई पोलिस कर्मचारी सचिन वाझे याच्या पत्रात महाविकास आघाडीमधील मंत्र्यांवर त्याने वसुलीचे गंभीर आरोप आहेत परिणामी या प्रकरणाची सीबीआय कडून सखोल चौकशी करावी, अशी प्रदेश भाजपची मागणी असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान आज चंद्रकांत पाटील यांनी लिहलेल्या पत्रामध्ये त्यांनी सचिन वाझे यांच्या प्रकरणाबद्दल काही गोष्टी नमूद केल्या आहेत. त्यात सचिन वाझेचं निलंबन 2004 साली करण्यात आले होते. पण 2020 मध्ये कोरोना संकटात मनुष्यबळ वाढवण्यासाठी त्यांना पुन्हा पोलिस दलात रूजु केल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. या सचिन वाझे प्रकरणाविषयी महाविकास आघाडीची भूमिका याबद्दल बोलताना त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याला बेकायदेशीर गुटखा विक्रेत्यांकडून 100 कोटी वसूल करण्यास सांगितलं असल्याचाही दावा करण्यात आला आहे. सचिन वाझे हे अनिल परब यांच्या आदेशावरून वसुली करत असल्याचाही त्यात दावा आहे. महाराष्ट्रातील जनतेचा राज्यातील कायदा व सुव्यवस्था वरील विश्वास उडाल्याचं चित्र असल्याने केंद्रीय गृहमंत्र्यांना पाठवल्याचं त्यांनी म्हटलं आहे. (नक्की वाचा: Anil Deshmukh: धोका आहे!, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडी चौकशीला जाणे टाळले, पत्र लिहून कळवले कारण).
ANI Tweet
Maharashtra BJP president Chandrakant Patil writes to Home Minister Amit Shah demanding a CBI inquiry against Deputy CM Ajit Pawar and State Transport Minister Anil Parab. pic.twitter.com/5j48JyRNMK
— ANI (@ANI) June 30, 2021
काही दिवसांपूर्वीच राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे ईडी च्या रडार वर आले होते. त्यांचे दोन निकटवर्तीय ईडीच्या कोठडीत आहेत. तर सध्या अनिल देशमुखांविरूद्धही सीबीआय आणि ईडी तपास, चौकशीचा ससेमिरा सुरू आहे.