Vasai: प्रेमभंगातून तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे वाचला जीव
Crime Scene | Representational Image | (Photo Credits: PTI)

प्रेम प्रकरणातून तरूण आणि तरूणींनी आत्महत्या (Suicide) केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यातच आपल्या प्रेयसीने अन्य दुसऱ्या मुलाबरोबर लग्न केल्याने मुंबईतील (Mumbai) एका तरूणाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. यासाठी तो वसई पूर्वेच्या (Vasai East) भागवत टेकडीवर गेला. याची माहिती पोलिसांना त्यांना घटनास्थळी धाव घेतली आणि तरूणाचा जीव वाचवला. ही घटना शनिवारी सकाळी अकरा वाजेदरम्यान घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरूण हा व्यवसायिक असून त्याची वसईत कंपनी आहे. त्याचे वसईत राहणाऱ्या एका मुलीशी प्रेमसंबंध होते. मात्र, लग्नाला उशीर लागत असल्याचे त्याच्या प्रेयसीने अन्य दुसऱ्या मुलासोबत लग्न केले. यामुळे संबंधित तरूण नैराश्यात गेला. यातूनच त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, तो शनिवारी सकाळी आत्महत्या करण्यासाठी वसई पूर्वेच्या टेकडीवर गेला. याबाबत माहिती मिळताच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे दोन कर्मचारी बालाजी गायकवाड आणि सचिन बळीद यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली. तसेच तरूणाला फोनवर व्यस्त ठेवून आणि दोनशे पायऱ्या चढून पोलिसांनी त्याला आत्महत्या करण्यापासून रोखले आहे. ज्यामुळे त्याचा जीव वाचला आहे. या संदर्भात लोकसत्ताने माहिती दिली आहे. हे देखील वाचा- माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांचा तुम्ही द्वेश का करता? संजय राउत यांचा केंद्र सरकारला थेट सवाल

या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित तरूणाची समजूत काढली. तसेच त्याच्या आत्महत्येचे कारण जाणून घेतले. आपल्या प्रेयसीने अन्य दुसऱ्या मुलासोबत लग्न केल्याने या तरुणाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी तरूणांचा जीव वाचवल्याबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.