
महाराष्ट्रामध्ये मार्च महिन्यापासून धुमाकूळ घलात असलेला कोरोना वायरस (Coronavirus) अद्यापही पूर्णपणे हद्दपार झालेला नाही. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र राज्य सरकारचे आगामी हिवाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Winter Session) परंपरेनुसार नागपूर (Nagpur) मध्ये घेण्याऐवजी मुंबई (Mumbai) मध्ये आयोजित केले जाऊ शकते. दरम्यात येत्या काही बैठकीत त्याचा प्रस्ताव येऊन त्यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान आज प्रधाव सचिव राजेंद्र भागवत हिवाळी अधिवेशनाच्या तयारीबाबत आढवा बैठक घेणार आहेत. Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी- आरोग्यमंत्री राजेश टोपे.
यंदाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तयारीचा आज घेण्यात येणारा आढावा विधान परिषदेचे सभापती व अध्यक्ष यांच्यासमोर ठेवला जाईल. याआधारे कामकाज सल्लागार समितीची बैठक होईल. त्यानंतर अधिवेशनाबद्दल पुढील 8-10 दिवसांत अंतिम निर्णय होणार आहे.
यंदा 7 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे नागपूर मध्येच हिवाळी अधिवेशन घेण्यावर आग्रही आहेत. महिन्याभरापूर्वी त्यांनी बोलताना नागपूर मध्ये विधानभवनात 'निगेटिव्ह प्रेशर कक्ष' निर्माण करून आमदारांना कोरोना संसर्गापासून दूर ठेवता येऊ शकतं असा विचार मांडला होता. तर आमदार विकास ठाकरे यांनी त्यावेळेस यंदाचं हिवाळी अधिवेशन रद्द करण्याची मागणी केली होती.
दरम्यान यंदा मुंबई मध्ये पावसाळी अधिवेशन देखील अवघ्या 2 दिवसांचं आयोजित करण्यात आलं होतं. यामध्येही कोरोना टेस्ट करूनच आमदार, त्यांचे सचिव आणि अन्य कर्मचार्यांना विधिमंडळात प्रवेश दिला होता. यंदा हिवाळी अधिवेशन मुंबई मध्ये झाल्यास पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई ऐवजी नागपूर मध्ये होण्याचा अंदाज बांधला जात आहे.