विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकासआघाडी सरकारवर केलेल्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) हे विधानसभेत आता एक निवेदन सादर करणार आहेत. दिलीप वळसे पाटील यांनीच ही माहिती दिली. विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर पेनड्राईव्ह (Pendrive Case ) बॉम्ब फोडला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात अनेकांना धक्का बसला. फडणवीस यांच्या आरोपांवर महाविकासआघाडी विधीमंडळामध्ये कोणती भूमिका घेणार याबाबत उत्सुकता होती. दरम्यान, दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी आपण आज विधिमंडळात उपस्थित राहू शकणार नसल्याचे कळवले होते. त्यामुळे फडणवीस यांच्या विनंतीनुसार गुरुवारी निवेदन सादर करणार असल्याची माहिती वळसे पाटील यांनी दिली.
देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महाविकासआघाडीवर गंभीर आरोप केले. फडणवीस यांनी म्हटले की, राज्य सरकारचे विशेष वकील प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयात विरोधकांची कत्तल करण्याचे कारस्थान शिजले. या कारस्थानाचे चव्हाण यांचे कार्यालय हेच मंख्य ठिकाण आहे. या कारस्थानातूनच गिरीश महाजन यांच्यावर कट करुन खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. या वेळी फडणवीस यांनी विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले. या प्रकरणाची माहिती भरलेला एक पेनड्राईव्हच फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांना दिला. (हेही वाचा, Sanjay Raut PC Highlights: ED चे अधिकारी महाराष्ट्रात वसुली एजंट, संजय राऊत यांचा आरोप; मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू)
देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. फडणवीस यांच्या आरोपांवरुन सर्वसामान्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही लोकांना वाटते फडणवीस हे महाविकासआघाडीवर भारी पडत आहे. तर काहींना वाटते फडणवीस हे जे आरोप करत आहेत ते भविष्यात त्यांच्यावरच बुमरॅंग होऊ शकते. महाविकासआघाडी केवळ संधिची वाट पाहात आहे. दरम्यान, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे विधिमंडळात काय निवेदन देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.