PMC बँक घोटाळ्यामुळे विधानसभा निवडणूकीच्या मतदानावर परिणाम होऊ शकतो, पीडित खातेधारकांचा अंदाज
PMC BANK Depositors (Photo Credits: Twitter/ ANI)

पंजाब अॅन्ड महाराष्ट्र कॉ-ऑपरेटिव्ह बँक (PMC) घोटाळा प्रकरणाचा परिणाम महाराष्ट्रात पार पडणाऱ्या विधानसभा निवडणूकीवर होऊ शकतो. या बँक घोटाळ्यामुळे मुलुंड परिसरातील लोक प्रभावित झाले आहेत. खरंतर पीएमसी बँकचे जवळजवळ 15 हजार खातेधारक आहेत.इंडिया टुने यांनी या भागात लोकांशी संवाद साधत बँक घोटाळामुळे त्यांच्यावर काय परिणाम झाला याबाबत अधिक माहिती मिळवली. त्यामधून असे स्पष्ट झाले की, पीएमसी बँक घोटाळ्याचा परिणाम निवडणूकांवर जरुर होणार आहे. येथील स्थानिक रहिवासी आणि एक जनरल स्टोर चालवणारे 44 वर्षीय दिलीप गुप्ता यांनी असे म्हटले आहे की, परिवारीत सदस्यांच्या नावावर चार खाते बँकेत आहेत. तर माझ्या वडिलांची आयुष्यभराची कमाई या बँकेत अडकून पडली आहे.

तसेच पीएमसी घोटाळ्याप्रकरणी शीख समुदाय सुद्धा अधिक प्रभावित झाला आहे. एका गुरुद्वाराचे कॅशियर यांनी असे म्हटले की, मुंबईतील 90 टक्के गुरुद्वारांची खाती पीएमसी बँकेत आहेत. तर पीएमसीच्या या घोटाळ्यामुळे ग्राहकांचा बँकेवरील विश्वासच उडाला आहे. एवढेच नाही बँक मध्ये खाते असलेल्या काही ग्राहकांनी आत्महत्या सुद्धा केल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती.(PMC Bank Crisis: पीएमसी बॅंक खातेदारांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा नाही; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्याचे आदेश)

एमसीकडून एचडीआयएलला कर्ज देण्यात आले होते, मात्र एचडीआयएलने कर्जाची रक्कम वेळेत न भरल्याने पीएमसी बँक आणि बँकेतील खातेदार आता अडचणीत आले आहेत.बँकेला 4355.43 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याबद्दल हा एफआयआर नोंदविण्यात आला. सध्या पीएमसी बॅंक धारक बॅंकेमधून कमाल 40,000 रूपये काढण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. मात्र लाखो रूपये बॅंकेत अडकून पडल्याने अनेक खातेदार हवालदिल झाले आहेत.