PMC Bank Crisis: पीएमसी बॅंक खातेदारांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा नाही; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्याचे आदेश
PMC Bank (Photo Credits: Twitter)

मुंबई मध्ये पीएमसी बॅंक (PMC Bank) खातेदारांसमोरील अडचणींमधील वाढ झाली आहे. आज पीएमसी बॅंकेच्या खातेदारांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला नाही. मुंबई हायकोर्टामध्ये याबाबतची याचिका दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या आरबीआयकडून पीएमसी बॅंकेवर आर्थिक निर्बंध घालण्यात आले आहेत. याप्रकरणी 11 जण अटकेमध्ये आहेत.

आज ( 18 ऑक्टोबर) दिवशी सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी झाली आहे. दिल्लीतील बिजोन कुमार मिश्रा यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टानं आज नकार दिला. हायकोर्टात याचिका दाखल करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं याचिकाकर्त्याला दिले आहेत. HDIL च्या संचालकांचे अपील, संपत्ती विकून पीएमसी बँकेचे कर्जफेड करा. 

ANI Tweet  

सध्या पीएमसी बॅंक धारक बॅंकेमधून कमाल 40,000 रूपये काढण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. मात्र लाखो रूपये बॅंकेत अडकून पडल्याने अनेक खातेदार हवालदिल झाले आहेत.