विधानसभा निवडणूकीदरम्यान मतदान केंद्र आणि स्ट्रॉन्गरुम पासून 3 किमी अंतरावर इंटरनेट बंद ठेवण्याची राष्ट्रवादी पक्षाची मागणी
Voting | Image used for representational purpose | Photo Credits: File Image

महाराष्ट्रात येत्या 21 तारखेला विधानसभा निवडणूका पार पडणार आहे. तर मतदान करण्यासाठी वापरण्यात येणारे ईव्हीएम मशीन (EVM Machine) आणि व्हीव्हीपॅट (VVPAT) सुरक्षित आणि हॅकिंग करुन सुद्धा मतदानची आकडेवादी बदलू शकता येत नाही असा दावा निवडणूक आयोगाकडून करण्यात येतो. मात्र विरोधकांनी नेहमीच व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मशीनला विरोध दर्शवला आहे. त्यामुळेच आता ही राष्ट्रवादी (NCP) पक्षाने मतदान केंद्र आणि स्ट्रॉन्गरुम  पासून 3 किमी अंतरावर इंटरनेट बंद ठेवावे अशी मागणी केली आहे. तर मतदानापासून ते मतमोजणी पर्यंत मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून मतदानाची हॅकिंग होऊ शकते असे राष्ट्रवादीने म्हटले आहे.त्यामुळेच इंटरनेट सेवा बंद असावी असे त्यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादीला विधानसभा निवडणूकीसाठी पार पडणाऱ्या मतदाना दरम्यान व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मशीन हॅक करुन मत फिरवली जातील अशी शंका वाटत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे महासचिव शिवाजीराव गर्जे यांनी इंटरनेट बंद ठेवण्यासंदर्भात निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. तसेच इतर राज्यांमध्ये निवडणुकी दरम्यान अशा प्रकारे इंटरनेट सेवा खंडित करून खबरदारी घेतली गेल्याचे निरीक्षण आहे असे ही म्हटले आहे.(मुंबई उपनगर जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघ: मुलुंड ते घाटकोपर पूर्व चे उमेदवार, महत्त्वाच्या लढती आणि निकाल घ्या जाणून)

या निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी लागणार आहे. राज्यात 288 मतदारसंघांमध्ये एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्र नबनिर्मान सेनेपासून कॉंग्रेस,राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, भाजप, रिपाई सह अपक्षांनी देखील आपली राजकीय ताकद पणाला लावली आहे. तर गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवत एक हाती सत्ता मिळवली होती. परंतु, या विधानसभेत कोणता पक्ष बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.