Maharashtra Assembly Elections 2019: विधानसभा निवडणूकीसाठी शिवसेनेला भाजपाने दिलेला जागा वाटपाचा फॉर्म्युला पटणार?
Shiv Sena Chief Uddhav Thackeray | (Photo Credit: You Tube)

महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) 2019 वेळी शिवसेना (Shiv Sena)-भाजप (BJP) पक्षाच्या युतीबाबत कोणता ही वाद समोर आला नाही. परंतु यंदाच्या विधानसभा निवडणूकी वेळी युती मध्ये काही गोष्टींबाबत मतभेद असल्याचे दिसून येत आहेत. अशीच स्थिती विधानसभा निवडणूक 2014 मध्ये दिसून आली होती. परंतु फरक एवढाच आहे की या वेळी भाजपकडे युतीबाबत सगळी सूत्र हातात आहेत.

सूत्रांच्या मते शिवसेनेने गेल्या वेळी पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीवेळी दोन्ही पक्षाला जेवढ्या जागा देण्यात आल्या होत्या तेवढ्याच जागा आता ही दोन्ही पक्षाकडे असायला हव्यात. तर शिल्लक राहिलेल्या जागामध्ये वाटप केले जाणार आहे. त्यामुळे शिवसेनेला 115 जागा मिळणार आहेत. परंतु भाजपचा हा जागवाटपाचा फॉर्म्युला पटलेला नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते की, विधानसभा निवडणूक 2019 वेळी युतीला समांतर जागा देण्यात येणार आहेत.(Maharashtra Assembly Elections: रामदास आठवले यांची युतीमध्ये 10 जागांसाठी मागणी; शिवसेना-भाजपा 240 जागा जिंकणार असल्याचा व्यक्त केला विश्वास)

गेल्या आठवड्यात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लवकरत विधानसभा निवडणूकीसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवला जाईल असे म्हटले होते. परंतु अद्याप आठवडा उलटून गेला असला तरीही याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. तर 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीवेळी शिवसेनेला 150 जागांपेक्षा कमी जागा देणे अमान्य होते. त्यामुळे यंदाच्या ही निवडणूकीत त्यासारखाच फॉर्म्युला शिवसेना वापरत आहे. परंतु सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपकडून शिवसेनेला 128 जागा विधानसभेसाठी देण्यात येत आहेत. मात्र यावर शिवसेनेने विरोध केला असून कमीतकमी 135 जागा देण्यात याव्यात अशी मागणी केली आहे.