Maharashtra Assembly Election Result 2019 (File Image)

आज 24 ऑक्टोबर हा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhansabha Elections Result)  निकालाचा दिवस अगदी रोमहर्षक ठरला. महाराष्ट्रातील 288 मतदारसंघांसाठी 21 ऑक्टोबर रोजी निवडणूक मतदान घेण्यात आले होते तर आज या प्रक्रियेचा निकाल जाहीर करण्यात आला. सकाळपासून सुरु असणाऱ्या मतमोजणीत महाराष्ट्राच्या जनतेचा कौल हा शिवसेना- भाजपा महायुतीला 160 जागा प्राप्त झाल्याचे दिसून आले तर काँग्रेस, राष्ट्रवादी (Congres- NCP) महाआघाडीला 103 जागांवर समाधान मानावे लागले आहे. दरम्यान, कोणत्याच पक्षाला बहुमताचा मॅजिक आकडा (145 जागा)  मिळवता आल्या नाहीत. आजच्या निकालात काही ठिकाणी मातब्बर राजकीय मंडळींचा पराभव तर काही ठिकाणी तरुण मंडळींनी मारलेली बाजी अशी चढाओढ दिसून आली होती. यातच पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे (Dhananjay Munde)  यांच्याविरुद्ध पराभव झाला तर नवोदित तरुण उमेदवार रोहित पवार (Rohit Pawar), आदित्य ठाकरे (Aaditya Thackrey) यांनी पहिल्याच निवडणुकीत विधानसभेत जागा मिळवली आहे. आजच्या या संपूर्ण दिवसातील घडामोडींचा एक आढावा जाणून घेऊयात..

आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. प्राथमिक फेरीचा कल पाहताच महायुतीला जनतेने मतांची भेट दिली होती, तर काहीश्या प्रमाणात राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाआघाडीने सुद्धा गती घेतली होती. यामध्ये साऱ्यांची लक्ष काही मुख्य लढतींकडे लागून होते, यामध्ये परळी येथे पंकजा मुंडे यांचा पराभव तर वांद्रे पूर्व मतदारसंघात विश्वनाथ महाडेश्वर यांना हरवून जिशान सिद्दीकी यांचा विजय हे अनपेक्षित निकाल समोर आले होते. साहजिकच महायुतीला हा मोठा धक्का होता.

दुसरीकडे, यंदा तरुण उमेदवारांनी चांगली कामगिरी केल्याची दिसून आले. यामध्ये वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे तर कर्जत जामखेड मधून रोहित पवार, श्रीवर्धन येथून आदिती तटकरे, बीड  मधून काँग्रेसचे  संदीप क्षीरसागर  यांच्या गळ्यात विजयी माळा पडल्या.  यासोबतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, बारामतीतून अजित पवार, यांसारखे काही अपेक्षित निकाल सुद्धा लागले.

तर आज लोकसभेच्या सातारा मतदारसंघासाठी पोटनिवडणूकीचा निकाल देखील जाहीर करण्यात आला, यामध्ये भाजपाच्या उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी धूळ चारून पुन्हा केदा सातारा राष्ट्रवादीच्या पारड्यात जिंकून आणला.

निवडणूक निकालाचे आकडे समोर येत असताना महायुतीच्या नेत्यांनी म्हणजेच देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन नागरिकांची आभार मानले तसेच येत्या काळात सत्ता व्हाटअप लक्षात घेऊन सत्तास्थापन करण्यात येईल असे सुद्धा स्पष्ट केले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजपाच्या कार्यलयातून बोलताना महाराष्ट्रात येत्या काळातही राजकीय स्थैर्य टिकून राहावे अशी सदिच्छा देत जनतेचे आभार मानले.

दरम्यान, सध्या कार्यरत असणाऱ्या सरकारचा कार्यकाळ 9 नोव्हेंबर रोजी संपुष्ठात येणार आहे, त्यानुसार शपथविधी व सत्तास्थापनाचा कार्यक्रम पार पडेल