महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (Maharahstra Assembly Elections 2019) निमित्त मतदान प्रक्रिया येत्या 21 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार असून त्यानंतर लगेचच 24 ऑक्टोबर निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी या अनुषंगाने निवडणूक काळात मुंबई सह पुणे, नागपूर , नाशिक ठाणे परिसरात दारू विक्रीस (Selling Liquor) मनाई करण्यात आली आहे, परिणामी या काळात दारू विक्रेत्यांना दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, याबाबत आज मुंबई शहर जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे (Shivajirao Jondhale) यांनी अधिकृत घोषणा करत. मतदानाच्या दोन दिवस आधी म्हणजेच 19 व 20 ऑक्टोबर तसेच मतदानाच्या दिवशी 21 ऑक्टोबर रोजी व निवडणूक निकालाच्या दिवशी म्हणजेच 24 ऑक्टोबर रोजी दारू विक्री होणार नसल्याचे सांगितले आहे.
प्राप्त माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाकडून देखील याबाबत माहिती देण्यात आली होती. यंदाच्या लोकसभा निवडणूक काळात सुद्धा मतदानाच्या दोन दिवस आधी व निकालाच्या दिवशी दारू विक्रीला मनाई करण्यात आली होती.Dry Day In October 2019: महात्मा गांधी जयंती, दसरा, विधानसभा निवडणूक, दिवाळीच्या निमित्ताने राज्यात 8 दिवस पाळला जाणार ड्राय डे, पहा संपूर्ण यादी
ANI ट्विट
Mumbai City Collector, Shivajirao Jondhale has issued orders to stop sale of all kind of liquor and closure of all liquor shops from 19th to 21st October and 24th October 2019. #MaharashtraAssemblyElections
— ANI (@ANI) October 6, 2019
दरम्यान, या दिवसात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिक दारू बंदीच्या संबंधित निर्देशांचे पालन करतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान हुल्लडबाज कार्यकर्ते व त्यांच्यामुळे होणार गदारोळ रोखण्यासाठी ही बंदी लागू करण्यात आली आहे.निवडणूक निकालाच्या दिवशी दारू पिऊन हल्ला माजवणाऱ्या कार्यकर्ते व अतिउत्साही समर्थकांवर यामुळे चाप बसणार आहे.