NCP (Photo Credits-File Image)

महाराष्ट्रात (Maharashtra) होणाऱ्या विधानसभा निवडणूकीसाठी (Assembly Elections) तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात असून राजकरण्यांमध्ये याबबात मोठी उत्सुकता दिसून येत आहे. मात्र दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाला गळती लागली असून यामधील नेतेमंडळी शिवसेना-भाजप युतीच्या वाटेवर गेले आहेत. याच पार्श्वभुमीवर राष्ट्रवादीला नंदुरबार जिल्ह्यातून आणखी एक धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावित (Rajendra Gavit) यांना विधानसभा निवडणूकीत उमेदवारी न दिल्यास पक्ष सोडणार असल्याचे धक्कादायक विधान केले आहे. अप्रत्यक्षपणे आता गावित यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पक्ष सोडण्याचा इशारा दिला असल्याचे बोलले जात आहे.

2014 मध्ये झालेल्या निवडणूकीत राजेंद्र गावित यांना राष्ट्रवादीकडून शहदा-तळोदा येथून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला आहे. परंतु कोणाला उमेदवारी मिळणार यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. याच स्थितीत आज गावित यांनी शहादा येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यादरम्यान, 'तिकिट न मिळाल्यास ज्या पक्षाकडून विधानसभेसाठी तिकिट दिले जाईल तिथे जाणार' असल्याचे विधान केले आहे. तर राजेंद्र गावित हे भाजप नेते विजयकुमार गावित यांचे बंधू आहेत. (Maharashtra Assembly Elections 2019: विधानसभा निवडणूकीसाठी अजित पवार यांच्याकडून पुणे येथील जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर)

नंदुरबार येथील चारही विधानसभा मतदारसंघात आघाडीच्या वाटाघाडीत काँग्रेसला सुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर या ठिकाणी दोन मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत. तर गेल्या निवडणूकीत गावित यांनी येथील जागेवर विधानसभा निवडणूक जिंकल्याने आघाडीच्या मतांमध्ये फूट पडल्याचे दिसून आले होते. तर नवापूर येथील मतदारसंघासाठी काँग्रसेचे आमदार सुरुपसिंग नाईक आहेत. त्यामुळे काँग्रेस नेते शरद गावित यांनी राष्ट्रवादी पक्षाला ही जागा सोडण्याची मागणी करत आहेत. या जागेवरुन गेल्या विधानसभेसाठी आघाडीमध्ये मोठा वाद सुद्धा झाला होता.