Maharashtra Assembly Elections 2019: निवडणुकीच्या रणधुमाळीत नेत्यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप हे काही नवे नाहीत. परंतू, कधी कधी भाषण करताना भावनेच्या भरात आपण काय बोलतो याचे भानच नेत्यांना राहात नाही. ते भलतेच काहीतरी बोलून जातात. एकेकाळचे शिवसैनिक ( Shivsainik) आणि शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे संस्थापक हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांच्या बाबतीतही असेच काहीसे घडले. निवडणुकीच्या मैदानात शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करताना जाधव यांची जीभ कमालीची घसरली. हर्षवर्धन जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका केली. आपल्या भाषणात बोलताना 'मुसलमानांचं इतकंच वावडं आहे तर मग सत्तार तुमच्या आईचा....!', असे विधान जाधव यांनी केले. जाधव यांच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियवर व्हायरल होत आहे. हर्षवर्धन जाधव हे कन्नड विधानसभा मतदारसंघातून मैदानत आहेत.

अब्दुल सत्तार हे काँग्रेस आमदार होते. गेली अनेक वर्षे ते काँग्रेस पक्षासोबत राहिले आहेत. दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर सत्तार यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. शिवसेनेनेही मग युतीच्या जागा वाटपात सिल्लोड हा मतदारसंघ आपल्याकडे घेत सत्तार यांना उमेदवारी दिली. त्या आधी सिल्लोड हा मतदारसंघ हा भाजपकडे होता. सत्तार यांच्या या उमेदवारीवरुनच जाधव यांनी शिवसेना नेतृत्वावर टीका केली आहे.

नेमकं काय बोलले हर्षवर्धन जाधव?

एका प्रचार सभेत बोलत असताना हर्षवर्धन जाधव म्हणाले, “हा हरामखोर हर्षा, याच्यामुळे मुसलमान निवडून आला लोकसभेला. हे शिवसेनेचं भाषण आहे. दुसरं काही भाषण नाही त्यांच्याकडं. आमचा उमेदवार असं करतो, तसं करतो हे नाही. आमच्या खासदाराने पंचवीस वर्षात काय केलं हे नाही. आमच्या उमेदवाराला किती अक्कल आहे, तो ट्रफिक पोलिसला फोन करू शकतो की नाही, हे नाही. तर काय? हर्षामुळे मुसलमान आला ना निवडून. आहो तुम्ही येडे झाले का, त्याला कुठं मतदान करू ऱ्हायले. हे शिवसेनेच भाषण राहणार आहे उद्या. केलंच तसं भाषण त्यांनी परवा, उद्धव ठाकरेंनी. हिरवा वरती चढवला, भगवा खाली आला. मी त्यांना एक प्रश्न विचारतो, विधानसभेतही विचारतो आणि तुमच्या समक्षही शिवसैनिकांना एक प्रश्न विचारतो. एव्हढंच तुम्हाला मुसलमानांच्याबद्दल वावडं आहे, तर सत्तार तुमच्या आईचा नवरा लागतो का? कोण लागतो सत्तार हा? कोण लागतो सत्तार तुमचा? पाहुणा आहे, चुलता आहे? हमारे अब्दुल भाई अभी अभी शिवसेना में आये है…,” अशी वादग्रस्त आणि पातळी सोडून हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या भाषणात वक्तव्य केली आहेत. (हेही वाचा, नाशिक शिवसेना पक्षात असंतोष, युतीला धक्का; 36 नगरसेवक, 350 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा)

हर्षवर्धन जाधव भाषण व्हिडिओ

दरम्यान, निवडुकीच्या रणधुमाळीत अनेक नेत्यांची वादग्रस्त वक्तव्य चर्चेत राहिली आहेत. यात एकमेकांवर केलेल्या टीका-टिप्पण्या, आरोप प्रत्यारोप, उपमा यांसह हातवारे आदींचा समावेश आहे. यापैकी शरद पवार यांनी केलेले हातवारे. तर, देवेंद्र फडणवीस यांनी केलेला नटरंग चित्रपटाचा उल्लेख. दुसऱ्या बाजूला जयंत पाटील यांनी फडणवीस यांनी अंगाला तेल लावलेला फोटो प्रसिद्ध करावा अशी केलेली मिश्कील मागणी, असे बरेच उल्लेख या निवडणुकीत चर्चेला आलेलेल पाहायला मिळतात.