NCP, Congress | (Photo credit: Archived, edited, representative images)

Maharashtra Assembly Elections 2019: विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस (National Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि मित्रपक्षांची आघाडी झाली आहे. आघाडीचे जागावाटप पूर्ण झाले असून, त्यानुसार उमेदवार याद्याही जाहीर झाल्या आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षानेही आपापली उमेदवार यादी जागावाटपानुसार जाहीर केली. परंतू, पंढरपूर (Pandharpur Assembly Constituency) मतदारसंघामध्ये मात्र आघाडीत घोळ झाल्याचे पुढे आले आहे.

एकाच मतदारसंघात आघाडीचे दोन उमेदवार 

पंढरपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा दोन्ही पक्षांनी उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसने पंढरपूरमध्ये शिवाजीराव काळुंगे यांना तर राष्ट्रवादी काँग्रेसने भआरत भालके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. एकाच मतदारसंघात आघाडीचे दोन उमेदवार जाहीर होणे ही नजरचूक आहे की आघाडीतील घोळ हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

काँग्रेस उमेदवारांची तीसरी यादी

नंदुरबार - मोहन सिंग, शिरपूर - रणजीत पावरा, नागपूर पूर्व - पुरुषोत्तम हजारे, नागपूर मध्य - ऋषीकेश शेळके, अहेरी - दीपक अत्राम, परभणी - रवीराज देशमुख, सिल्लोड - प्रभाकर पलोडकर, औरंगाबाद पश्चिम - रमेश गायकवाड, नाशिक मध्य - शाहू खैरे, मालाड पश्चिम - असलम शेख, घाटकोपर पश्चिम - मनिषा सुर्यवंशी, कलिना - जॉर्ज अब्राहम, वांद्रे पश्चिम - असिफ जकेरिया, वडाळा - शिवकुमार लाड, भायखळा - मधुकर चव्हाण, अलिबाग - श्रद्धा ठाकूर, अक्कलकोट - सिद्धाराम म्हेत्रे, पंढरपूर - शिवाजीराव काळुंगे, कुडाळ - हेमंत कुडाळकर, कोल्हापूर उत्तर - चंद्रकांत जाधव.

(हेही वाचा, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: कॉंग्रेस पक्षाच्या तिसर्‍या उमेदवार यादीमध्ये सिद्धाराम म्हेत्रे, असलम शेख,शिवकुमार लाड यांच्यासोबत 20 जणांची नावं जाहीर)

विधानसभा निवडणूक प्रक्रियेत महाराष्ट्रात 8 कोटी 94 लाख मतदार मतदान करतील. महाराष्ट्रात 288 मतारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडेल. 27 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 4 ऑक्टोबर हा निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम दिवस असेल. 7 ऑक्टोबर पर्यंत दाखल केलेले आणि छाननीमध्ये टिकलेले उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. त्यानंतर 21 ऑक्टोबर या दिवशी प्रत्यक्ष मतदान तर, 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे.