महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचे निकाल 24 ऑक्टोबरला जाहीर करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री पदावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे. शिवसेनेने मुख्यमंत्री पद आम्हाला मिळावी अशी जोरदार मागणी केली असून आम्ही या निर्णयावर ठाम असल्याची भुमिका स्विकारली आहे. त्यामुळे भाजप सोबत त्यांचे वाद सुरु झाले आहेत. शिवसेना नेता दिवाकर राउत महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांना भेटण्यासाठी राजभवनात पोहचले आहेत. तर भाजप-शिवसेना पक्षाने गव्हर्नर यांची एकत्रित भेट न घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी गव्हर्नर यांची भेट घेणार आहेत. भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यांनी असे म्हटले आहे की, भेटण्यासंदर्भात अद्याप कोणताही अजेंडा तयार करण्यात आलेला नाही. मात्र सरकार कोणाचे बनणार याबाबत नक्की चर्चा होणार आहे. तर शिवसेनेचे राउत हे सुद्धा गव्हर्नर यांची भेट घेणार असून पक्षाची रणनिती आणि आमदरांच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांचा मुद्दा मांडणार आहेत.(भाजप-शिवसेना युतीमध्ये सुरु असलेला तणाव कमी करण्यासाठी अमित शहा मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटण्याची शक्यता)
शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपकडून 50-50 फॉर्म्युल्याबाबत लेखी आश्वासन मागितले आहे. त्यामध्ये दोन्ही पक्षादरम्यान मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ आडीच-अडीच वर्षाचा असावा असे लिहिण्यात आले आहे. खरंतर निवडणूकीच्या निकालापूर्वीच एकट्या भाजपला त्यांच्या जोरावर 145 जागा मिळणार असल्याचे म्हटले जात होते. भाजप स्वत:च्या जोरावर सत्ता स्थापन करु शकत नाही. त्यासाठी त्यांना शिवसेना, एनसीपी किंवा काँग्रेसची साथ असणे महत्वाचे आहे.
असे म्हटले जात आहे की, भाजपचे देवेंद्र फडणवीस यांना आमदार पदाचे नेतेपद दिल्यास त्यांच्याकडून सरकार स्थापनाचा दावा केलाज जाणार आहे. त्यावेळी शिवसेना सोबत आहे की नाही याचा फरक पडणार नाही. दुसऱ्या बाजूला शिवसेनेने असे म्हटले आहे की, मुख्यमंत्री पदासाठी ते कोणतीही तडजोड करणार नाहीत. त्यामुळे भाजपने आम्हाला अडीच वर्षासाठी मुख्यमंत्री पदाची कमान सांभाळण्यास द्यावी अशी मागणी केली जात आहे. त्यासाठी शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.