विधानसभा निवडणुकांसाठी अवघे काहीच दिवस शिल्लक असताना, सर्वच राजकीय पक्ष आपापल्या उमेदवार याद्या जाहीर करत आहेत. शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांची युतीत निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं असलं तरी शिवसेनेला मात्र कमी जागांवरचग समाधान मानावं लागलं आहे.
शिवसेना पक्षाचा मुख्यतः शहरी भागात बोलबाला असलं तरी भाजपने मात्र सेनेला 4 महत्त्वाच्या शहरापासून हद्दपार केले आहे. पुणे शहरात शिवसेनेचं अस्तित्व असूनही तेथील आठही जागांवरून सेनेला वगळलं आलं आहे व भाजप तेथील सर्व जागा स्वतः लढवणार आहे.
पुण्यातील शिवाजी नगर (सिद्धार्थ शिरोळे), कॅन्टोमेंट (सुनील कांबळे), पुणे पर्वती (माधुरी मिसाळ), कसबा पेठ (मुक्ता टिळक), भोसरी (महेश लांडगे), वडगाव शेरी (जगदीश मुळीक), खडकवासला (भीमराव तापकीर), हडपसर (योगेश टिळेकर) या सर्व जागा भाजपला गेल्या आहेत.
नाशिक शहरातील तीनही जागा या भाजपने स्वतःच्या ताब्यात घेतल्या आहेत. नाशिकमध्य (देवयानी फरांदे), पश्चिम नाशिक (सीमा हिरे), व चांदवड देवळा (डॉ. राहुल आहेर) हे भाजपचे उमेदवार असतील. त्याचसोबत नागपूर आणि नवी मुंबईसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्येदेखील सेनेला एकही सीट देण्यात आलेली नाही.