Union Home Minister Amit Shah | ( Photo Credits: Twitter/ ANI )

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी आज मतमोजणी सुरु आहे. अवघ्या काही वेळातच निवडणूकीचे निकाल स्पष्ट होणार असून कोणाची सत्ता येणार याकडे लक्ष लागले आहे. मात्र ताज्या अपडेट्सनुसार एनडीएने बहुमताचा आकडा पार केल्याचे दिसून आले आहे. याच पार्श्वभुमीवर भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी जनतेचे आभार मानले आहेत. तसेच महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचे अभिनंदन केले आहे.

विधानसभा निवडणूकीसाठी भाजप-शिवसेने महायुती करत एकत्रित निवडणूक लढवली. त्यामुळे महायुतीवर जनतेने दाखवलेल्या पाठिंब्यामुळे एनडीएने बहुमताचा आकडा पार केल्याचे म्हणत आभार मानले आहेत. त्याचसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्रातील सरकार नेहमीच राज्याच्या प्रगतीसाठी आणि सेवा करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.(महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2019 Live Updates: चांदिवली मतदार संघातून नसीम खान यांचा अवघ्या 409 मतांनी पराभव)

>>येथे पहा निवडणूकीच्या निकालाचे अपडेट्स

दरम्यान, विधानसभा निवडणूकीसाठी महाराष्ट्रात 288 जागांवर भाजपने 150 जागा आणि शिवसेनेने 124 जागांवर निवडणूक लढवली. तर उर्वरित जागा मित्रपक्षांसाठी सोडण्यात आल्या होत्या. दुसऱ्या बाजूला काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांनी अमुक्रमे 147-124 जागांवर निवडणूक लढवली. मात्र आता उद्या निवडणूकीचे निकाल सष्ट होणार असून कोणाची सत्ता महाराष्ट्रात प्रस्थापित होणार हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.