बीड: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Elections 2019) यंदा बीड (Beed) मध्ये काका- पुतण्या मध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळणार आहे. शिवसेनेचे (Shivsena) उमेदवार जयदत्त क्षीरसागर (Jaydutta Kshirsagar) विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) उमेदवार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांनी एकमेकांविरुद्ध नवा वाद सुरु केला आणि आता तर या वादाचे स्वरूप एकमेकांच्या चारित्र्यावर बोट उचलण्यापर्यंत पोहचले आहे. काही दिवसांपूर्वी संदीप यांनी जयदत्त यांच्यावर टीका करत त्यांनी 50 कोटी देऊन कॅबिनेट मंत्रीपद मिळवल्याचा आरोप केला होता, यावर उत्तर देताना जयदत्त यांनी सुद्धा मी अशा नशेत बोलणाऱ्यांची प्रश्नां उत्तर देत नाही असे म्हणत पलटवार केला, त्यामुळे बीड मध्ये मताधिक्यांच्या चढाओढी आधीच शाब्दिक चकमकीचा वातावरण पाहायला मिळत आहे.
प्राप्त माहितीनुसार, संदीप यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करता आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर बागला इस्टेट परिसरात एक सभा घेतली होती, यामध्ये त्यांनी काका जयदत्त यांच्यावर बोलण्यास सुरुवात केली." ते आम्हाला गुंडप्रवृत्तीचे म्हणतात तरीही आजवर आम्ही त्यांच्यावर कधीच वैयक्तिक टीका केलेली नाही पण आता आम्हाला बोलण्याची गरज आहे असे म्हणत संदीप यांनी सुरुवातीला जनतेलाच मी बोलू का असा सवाल केला. यानंतर आमच्या काकांचे चारित्र्याचे पुरावे मी देतो, वाटल्यास कोणत्याही लॅब मध्ये जाऊन तपास करा, आणि खोटे निघाले तर मी निवडणुकीतूनच माघार घेईन असेही संदीप म्हणाले.
दरम्यान, या सर्व प्रकारांनंतर बीड मतदारसंघातून कोणाचा विजय होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. जयदत्त क्षीरसागर यांनी अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील आपल्या पदाचा राजीनामा देऊन मे महिन्यात शिवसेनेत प्रवेश घेतला होता. यानंतरलगेच महाराष्ट मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना देवेंद्रा फडणवीस यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची भेट दिली होती.