महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: महायुती असूनही शिवसेनेने 'या' जागांवर भाजप विरोधात उमेदवारांना दिले तिकिट
Uddhav Thackeray and Devendra Fadnavis (Photo Credits-Facebook)

महाराष्ट्रात येत्या 21 ऑक्टोंबरला होणारी विधानसभा निवडणूक (Assembly Elections) भाजप-शिवसेना महायुती (BJP-Shiv Sena Alliance) एकत्र लढवणार आहे. तर निवडणूकीसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला दोन्ही पक्षाच्या सहमतीने ठरवण्यात आला. मात्र शिवसेनेने स्वत:ला महायुतीपासून एक पाऊल पुढे ठेवले आहे. तसेच भाजपच्या खात्यात येणाऱ्या जागेवर आपले उमेदवार शिवसेने रिंगणात उतरवले आहेत.

कणकवली (Kankavli) आणि माण या दोन विधानसभेच्या जागा असून येथून शिवसेनेने भाजपचा उमेदवार असूनही तेथे स्वत:चा उमेदवार उतरवला आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघातून भापजने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांना तिकिट दिले आहे. तर माण येथून जयकुमार गोरे यांना निवडणूकीसाठी उमेदवारी दिली आहे. जयकुमार गोरे आणि नितेश राणे या दोन्ही नेत्यांनी 2014 मधील निवडणूकीत काँग्रेस मधून उमेदवारी मिळवत विजय मिळवला होता. पण सध्या या दोघांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे.(महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: बंडखोरांना भाजप-शिवसेना महायुतीत जागा नाही- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस)

नितेश राणे यांना कणकवली येथून भाजपने उमेदवारी दिल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी उडाली आहे. खरंतर नारायण राणे यापूर्वी शिवसेनेत होते. परंतु 2005 मध्ये नारायण राणे यांनी शिवसेनेला रामराम करत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. एवढेच नाही काँग्रेस पक्षात गेल्यानंतर नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर प्रचंड टीका ही केली. नारायण राणे यांनी 2007 मध्ये काँग्रेसला सुद्धा अलविदा करत स्वत:चा स्वाभिमान पक्ष स्थापन केला.कणवकली येथून भाजपने नितेश राणे यांना देण्यात आलेल्या तिकिटाच्या मागे नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांचे जुने वाद होते. यामुळेच भाजपने त्यांच्या पहिल्या दोन उमेदवार यादीत नितेश राणे यांचे नाव झळकवले नाही.

दरम्यान, शिवसेनेने सतीश सावंत यांना नितेश राणे यांच्या विरोधात उमेदवारी दिली आहे. तसचे माण येथून जयकुमार गोरे यांच्या विरोधात शेखर गोरे यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे आता या दोन्ही मतदारसंघात महायुतीमधील कोणाचा विजय होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.