Aditya Thackeray, Rohit Pawar, Sandeep Shirsagar And Dhiraj Deshmukh (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकला (Maharashtra Assembly Election 2019) अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले असून सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाने संबधित मतदारसंघात योग्य असा उमेदवार निवडला आहे. परंतु, या विधानसभेत युवा नेतृत्वाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी या निवडणुकीत भाजप (BJP), शिवसेना (ShivSena), राष्ट्रवादी (National Congress Party) पक्षाकडून युवांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच या निवडणुकीत अनेक युवा नेत्यांना आपले वर्चस्व निर्माण करण्याची संधी मिळाली आहे. यात अदित्य ठाकरे (Aditya Thackeray), रोहित पवार (Rohit Pawar), संदिप क्षीरसागर (Sandeep Shirsagar) आणि धीरज देशमुख (Dhiraj Deshmukh) यांचा समावेश आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून पार्थ पवार यांनाही मावळ येथून उमेदवारी देण्यात आली होती. परंतु, पार्थ यांचा पराभव झाला होता. महत्वाचे म्हणजे, महाराष्ट्र विधान निवडणूक २०१९ मध्ये कोणता युवा नेता बाजी मारणार? येत्या काही दिवसाच महाराष्ट्रातील जनतेला कळणार आहे.

अदित्य ठाकरे:

शिवसेना पक्षाचे अध्यक्ष उद्धव यांचे सुपुत्र अदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा झेंडा हाती घेवून राजकारणात उडी घेतली आहे. अदित्य ठाकरे यांना शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या वरळी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. एवढेच नव्हेतर, शिवसनेचे कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणूनही अदित्य ठाकरे यांच्याकडे पाहिले जात आहे. अदित्य ठाकरे यांनी काही वर्षापूर्वीच युवानेतेचा कारभार खांद्यावर घेतला होता. नुकतीच त्यांनी राज्यात महाजन आशिर्वाद यात्रेचे आयोजन केले होते. या निवडणुकीत अदित्य ठाकरे यांचा पारडे जड असून त्यांच्याविरोधात कोणताही मजबूत उमेदवार नसल्याचे दिसत आहे.

रोहित पवार:

रोहित पवार:

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली आहे. सध्या रोहित पवार राष्ट्रवादीच्या प्रचारादरम्यान शरद पवार यांच्यासोबत अधिक वेळ घालवत असल्याचे दिसत आहे. या निवडणुकीत रोहित पवार हे कर्जत जामखेड मतदारसंघातून जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्याशी लढत देणार आहेत.

भाजप नेते राम शिंदे हे शक्तिशाली नेता असून जर या निवडणुकीत रोहित पवारांनी त्यांच्या पराभव केला तर, त्यांची मोठ्या नेत्यांमध्ये मोजणी केली जाईल.

संदीप क्षीरसागर:

महाराष्ट्र निवडणुकीत राष्ट्रवादीकडून संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. संदीप क्षीरसागर मराठवाडा मतदारसंघातून त्यांचे काका जयदत क्षीरसागर यांना लढत देणार आहेत. काही दिवसापूर्वी शिवसेना पक्षातून आपले राजकीय प्रवास सुरु करणारे संदीप क्षीरसागर आणि जयदत क्षीरसागर यांच्यात जोरदार टक्कर पाहायला मिळणार असा अंदाज वर्तवला जात आहे.

धीरज देशमुख:

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे धाकटा मुलगा धीरज देशमुख यांनाही निवडणुकीच्या मैदानात उडी घेवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. धीरज यांना लातूर ग्रामीण मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे. याचे मोठे भाऊ अमितदेखील लातूर शहरातून निवडणुक लढवत आहेत.